ठाणे : डोंबिवलीतील शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांचे निधन नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी काही दिवसापूर्वी केला होता. आता पुन्हा शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यूचा डुप्लिकेट दाखला काढून त्यांची संपत्ती हडपण्याचा प्रकार असमोर आल्याने शिक्षण क्षेत्रात एखाच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेची डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी दखल घेत विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गिता खरे , वर्षा देशमुख, प्रितम देशमुख, हर्षकुमार खरे, स्नेहा खरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. डोंबिवलीतील शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे यांचे निधन नसून त्यांची  हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी काही दिवसापूर्वी केला होता कल्याण न्यायालयाने संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. 


डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गिता खरे, वर्षा देशमुख, प्रितम देशमुख, हर्षकुमार खरे, स्नेहा खरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे प्रमोद हिंदुराव आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप शिवाजीराव जोंधळे यांचा मुलगा सागर जोंधळे यांनी केला होता. शिवाजीराव यांना जानेवारी 2022 मध्ये  यांना यकृताचा कर्करोग झाला. वितुष्ट दूर सारुन पहिल्या पत्नीचा मोठा मुलगा सागरने त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली. चेन्नई, मुंबई, डोंबिवलीतील रुग्णालयात शिवाजीराव यांच्यावर उपचार करण्यात आले. सागर यांची शिवाजीरावांबरोबरची जवळीक खरे कुटुंबीयांना आवडली नाही. सागरने वडिलांसाठी यकृत देण्याची तयारी केली. ती गिता खरे यांनी व्देषातून नाकारली. सागर व शिवाजीराव एक झाले तर आपणास शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करता येणार नाही, म्हणून गिता खरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीराव यांना कर्करोगाच्या योग्य उपचारापासून वंचित ठेवले. खोटी कारणे डॉक्टरांना सांगून त्यांना उपचाराविना घरी डांबून ठेवले. या निष्काळजीपणातून शिवाजीराव यांचा 19 एप्रिलमध्ये 2024 मृत्यू झाला, असे सागर यांनी तक्रारीत म्हटले आहे.


सर्टिफिकेटबाबत डॉक्टरांचा खुलासा


या धक्कादायक घटनेचा डोंबिवली विष्णुनगर पोलीस तपास करत असतांना पुन्हा आरोपींनी शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यूचा खोटा दाखला काढत शिवाजीराव जोंधळे यांची मालमत्ता नावे करण्यासाठी दावा केला आहे, हा धक्कादायक प्रकार शिवाजीराव जोंधळे यांचे थोरले चिरंजीव सागर जोंधळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. सागर जोंधळे यांनी डोंबिवलीतील तलाठी कार्यालयामध्ये चौकशी केली असता त्यांना डोंबिवलीतील ऑप्टिलाईफ खासगी रुग्णालयाचे सर्टिफिकेट आढळून आले, या सर्टिफिकेटची चौकशी केली असता रुग्णालयाचे मालक डॉक्टर हेमंत इंगोले यांनी खुलासा केला. शिवाजीराव जोंधळे यांना कधीही तपासले नाही व त्यांनी त्यांना कोणत्याही प्रकारची मेडिकल सर्टिफिकेट दिलेले नाही. तसेच सदर मृत्यू पत्रासोबत जोडलेले सर्टिफिकेट देखील खोटे आहे व त्याबाबत तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता, अशा आशयाचे पत्र सागर जोंधळे यांच्या वकिलांना डॉक्टर हेमंत इंगोले यांनी पाठवले. डॉक्टर इंगोलेंच्या या  खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा


महाराष्ट्रात दिवाळीनंतरच विधानसभा, 3 टप्प्यात मतदान?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच दुजोरा