Dhule Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता नंदुरबार-धुळे बसमध्ये (Nandurbar-Dhule Bus) दोन महिलांनी चोरी करण्याचा प्लॅन आखला होता. मात्र, तरुणाच्या सतर्कतेमुळे बसमधील 4 लाखांची चोरी उघड झाली आहे. या प्रकरणी दोन्ही महिलांना पोलिसांनी (Police) अटक केली असून रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

Continues below advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी पाटील हे दोंडाईचा येथून धुळे येथे येण्यासाठी नंदुरबार-धुळे बसमध्ये प्रवास करत होते. यावेळी सोनगीर येथून दोन महिला बसमध्ये चढल्या. त्यातील एक महिला शिवाजी पाटील यांच्या शेजारी बसली. तिने नगाव चौफुली (देवपूर, धुळे) येथे पाटील यांच्या बॅगेची चैन उघडून त्यातील 4 लाख 9 हजार 500 रुपये काढून दुसर्‍या महिलेने दिलेल्या बॅगेत ठेवले.

युवकाला लक्षात येताच बस थेट पोलीस ठाण्यात 

ही बाब बसमध्ये असलेल्या मोहित समाधान पाटील याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केली. तसेच बस थेट देवपूर पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर महिला पोलीस कर्मचार्‍यांनी संशयित महिलांची व त्यांच्या बॅगची झडती घेतली असता संपूर्ण रक्कम मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे. पद्मा राहुल शेट्टी (20, रा. चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर) व अक्षया राजन शेट्टी (20, रा. चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर) अशी दोघा महिला चोरट्यांची नावे आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.  

Continues below advertisement

धुळ्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

शुक्रवारी धुळे शहरातील वल्लीपुरा मौलवी गंज परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. आझाद नगर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने गोडाऊनवर छापा टाकला असता, मिराज, रजनीगंधा, विमल, राजनिवास यांसारख्या विविध ब्रँडच्या गुटखा व पान मसाल्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि पानमसाला विक्री, वाहतूक व साठवणुकीस बंदी घातली असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा करण्यात आला होता. सदर गोडाऊन सील करण्यात आले असून जप्त केलेल्या मालाची किंमत लाखोंच्या घरात आहे.  

आणखी वाचा 

New India Co-operative Bank: माजी जनरल मॅनेजराचा बँकेच्या तिजोरीवर डल्ला; दादर-गोरेगावमधील शाखेतून 122 कोटी रुपये लंपास