Dhule Crime News :  गेल्या ऑगस्ट महिन्यात एका आदिवासी अल्पवयीन मुलीला काही आज्ञता दिवसाढवळ्या अपहरण करुन घेऊन गेले होते. त्या अल्पवयीन मुलीच्या काकांना काही जणांनी चांदसे ता. शिरपुर येथे तुमची मुलगी आहे, असे खोटे सांगून बोलवले आणि त्यानंतर  त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर हे प्रकरण उजेडात येताच  प्रकरणातील आरोपींचा आणि अल्पवयीन मुलीचा लवकरात लवकर शोध घेऊन अल्पवयीन मुलीच्या परीवाराला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी पोलीस प्रशासनाने दिले होते. परंतु त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या पालकांवर आरोपीच्या परीवाराकडून चाकुने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेला आज चार- पाच  महिने होऊन देखील अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन आरोपींवर प्रशासनाकडून कुठलीही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही.


या सर्व जाचाला कंटाळून आणि प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अल्पवयीन मुलीचे पालक कैलास आत्माराम सौंदाणे यांनी आज  टोकाचे पाऊल उचलेले आहे. आक्कडसे ता. शिंदखेडा येथे त्यांनी आपली जिवन यात्रा संपवली आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वस्थरातून आता रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रशासकीय दिरंगाई आणि न्याय व्यवस्था कुचकामी ठरली आहे का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. 


बियरशॉपी समोर वाद, पोलिसांचा लाठीचार्ज 


अकोल्यात एका बियर शॉपी समोर सुरु असलेल्या वादादरम्यान खदान पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय. बिअर शॉपी  मालक आणि एका ग्राहकांमध्ये हा वाद होता. बिअर शॉपी समोर उभी केलेली दुचाकी चोरी झाल्याच्या संशयावरून ग्राहकाने सीसीटीव्ही तपासण्यासाठी हट्ट धरला. याच कारणावरून हा संपूर्ण वाद सुरू होता. त्यानंतर शाब्दिक वाद हाणामारी सुरू झाला,  अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत लाठीचार्ज करावा लागलाय. इतकच नाही तर बनणार्‍यांवर सुद्धा  लाठीचार्ज करून पोलिसांनी पांगवले आहे. त्यानंतर प्रकरण शांत झालेय. दरम्यान, अकोल्यातल्या सिंधी कॅम्प भागात काल रात्री उशिरा 1 वाजता सुमारास हा वाद झाला होता.  


दरम्यान, स्थानिक पत्रकार या संपूर्ण प्रकरणाचे चित्रकरण करत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर देखील दमदाटी केली, आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेतलाये. इतकंच नाही तर व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय.


हे ही वाचा