Banking Fraud : देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी (Banking Scam) सीबीआयने (CBI) डीएचएफएल (DHFL) कंपनीचे संचालक धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) आणि कपिल वाधवान (Kapil Wadhawan) यांना अटक केली आहे. हा 34 हजार कोटींचा घोटाळा आहे. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने वाधवान बंधूंना आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आधीच अटकेत असलेले आरोपी अजय रमेश यांनाही दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, धीरज वाधवन आणि कपिल वाधवन यांना लखनौ तुरुंगातून दिल्लीला ट्रान्झिट रिमांडवर हजर करण्यात आलं होतं. दोघांनाही दुसऱ्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती, तेव्हापासून वाधवान बंधू लखनो तुरुंगात होते. सीबीआयने मंगळवारी वाधवान बंधूंना विशेष सीबीआय कोर्टात हजर केलं. वाधवान बंधूंनी 34 हजार कोटींचा डीओचएफएल बँक घोटाळ केला असून यांची चौकशी करणं आवश्यक असल्याचा युक्तिवाद सीबीआयकडून करण्यात आला. यानंतर कोर्टाने त्यांनी रवानगी आठ दिवसीय सीबीआय कोठडीत केली.
सीबीआयकडून 10 दिवसांच्या कोठडीची मागणी
दरम्यान, या प्रकरणात सीबीआयकडून दहा दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने वाधवान बंधूंना आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. याशिवाय याप्रकरणी आधीच अटकेत असलेला आरोपी अजय रमेश याची कोठडी संपल्याने त्यालाही मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आलं. त्यालाही दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील छापेमारी वेळी अजय याला अटक करण्यात आली होती.
अजय रमेशच्या मालमत्तेवरील छापेमारी दरम्यान सीबीआयला सुमारे 40 कोटी रुपयांच्या मुर्ती आणि पेंटिग्स याशिवाय महागडी घड्याळ सापडली. हे सर्व सामान घोटाळ्याच्या रकमेशी संबंधित असल्याचं मानलं जात आहे. सीबीआयने विशेष कोर्टात सांगितलं की वाधवान बंधू आणि अजय रमेश या तिघांना समोरासमोर बसवून चौकशी करणं आवश्यक आहे.
काय आहे प्रकरण?
डीएचएफएलचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने सरकारचे अनुदान लाटल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी मुंबईतील बांद्रा येथे एक डीएचएफएलची एक खोटी शाखा उघडली आणि त्यामाध्यमातून 14,046 कोटी रुपयांची पंतप्रधान आवास योजनेचे खोटी कर्ज खाती तयार केली. ज्यांच्या नावाने खाती काढण्यात आली होती, त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते. या खात्यांना डेटाबेसमध्ये टाकण्यात आलं.
कपिल वाधवान आणि धीरज वाधवान हे दोघे येस बँक घोटाळ्याच्या संबंधित आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली आधीपासूनच तुरुंगात आहेत. आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 1,887 कोटी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी त्यांनी खोटी खाती तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.