Dharashiv: चारित्र्याच्या संशयातून महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडलीय. नवरा, नणंद आणि मेहुण्याने महिलेचं मुंडण करत भुवया काढत तिचं विद्रूपीकरण केल्याचं समोर आलंय. नणंद आणि मेहुण्याच्या प्रेमसंबंधाचं बिंग फुटू नये म्हणून हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. या घटनेने संपर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली असून बार्शी पोलिसांकडे तक्रार करूनही आरोपींवर कसलीही कारवाई झाली नाही. आता न्याय मागण्यासाठी पीडित महिला आणि तिच्या आईची भटकंती सुरु आहे. चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून समोर आलेल्या या लाजीरवाण्या घटनेनंतरही पोलीस या प्रकरणात लक्ष घालणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. (Dharashiv Crime)
नक्की प्रकरण काय?
चारित्र्याचा संशय घेत नवरा, नणंद आणि मेहुण्याने मुंडन करत भुवया काढत महिलेचं विद्रुपीकरण केल्याची घटना समोर आली आहे. नवरा, नणंद आणि मेहुण्याने मुंडन केल्याचा महिलेचा आरोप आहे. तिघांविरोधात सोलापूरच्या बार्शी शहर पोलिसात महिलीकडून तक्रार करण्यात आली असून महिला धाराशिव जिल्ह्यातील माहेरवाशीण आहे. महिलेला टॉर्चर करत मी केस कढल्याच वदवून घेत त्याचा घेत व्हिडिओ काढल्याचा महिलेचा आरोप आहे.तक्रार करूनही आरोपींवर कुठलीही कारवाई नाही. न्याय मिळावा यासाठी पीडित महिला आणि आईची भटकंती सुरु आहे.
सासरच्यांचा छळ, महिलेचं विद्रूपीकरण केलं
नणंद आणि मेहुण्याचे प्रेमसंबंध होते. पीडित महिलेला ते मान्य नसल्याच्या कारणातून आपलं बींग फूटू नये म्हणून नंणंद आणि मेहुण्याने महिलेवर घरात खूलेआम संशय घेण्यास सुरुवात केला. तू इतकी चांगली आहेस. तुझे बाहेर संबंध असणारच असं बोलायला सुरुवात केली. तुझ्या नवऱ्यासमोर हे सगळं सांगतो म्हणत धमकवण्यात आलं. संशयामुळे नंतर घरात रोज मारहाण होऊ लागली. लोखंडी पाईप हातात घेऊन खोटं बोललीस तर तुला जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली. घरात डांबून ठेवण्यात आलं.बाहेरही येऊ देत नव्हते. कोणाला बोलू देत नव्हते. 2016 ला लग्न झालं पण नणंद तिच्या नवऱ्याशी भांडण करून माघारी आली. माझ्या मेहुण्याशी आणि तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. 2017 पासून कौटुंबिक छळ होत असून 2023ला महिला वैतागून घर सोडून निघून गेली होती. आता 'त्या' प्रकरणावरून त्रास देणार नाही म्हणत पुन्हा घरात आली आणि छळाला पुन्हा सुरु झाल्याचं महिलेनं सांगितलं.
हेही वाचा:
Jalna Crime : प्रतीक्षा कोणाशी तरी सारखी फोनवर बोलते? सासूबाईंनी पकडलं, सुनेने काटा काढला अन्...