Kesari 2 Trailer: अक्षय कुमार (Akshay Kumar), आर. माधवन (R. Madhavan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या बहुचर्चित 'केसरी 2' (Kesari 2) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा 3 मिनिटं 2 सेकंदाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. दरवेळी आपल्या धमाकेदार कहाण्या रुपेरी पडद्यावर आणणारा अक्षय कुमार यावेळी ब्रिटीश राजवटीत अमृतसरमध्ये घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी घेऊन आला आहे. 


'केसरी चॅप्टर 2' मध्ये, अक्षय कुमार सी. शंकरन नायरची भूमिका साकारत आहे, ज्यांनी 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला होता. या हत्याकांडात हजारो भारतीयांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं. आजही जालियनवाला बागेच्या भिंतींवर गोळ्यांचे निशाण आहेत. 






ट्रेलर रिलीज होताच 'केसरी चॅप्टर 2' ट्विटरवर ट्रेंड करू लागला. चाहत्यांकडून ट्रेलरवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. ट्रेलर अद्भूत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. तसेच, अक्षय कुमारनं जोरदार कमबॅक केलं आहे. तसेच, अक्षयचे यापूर्वीची अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत.                                          


'केसरी' 2019  मध्ये प्रदर्शित झालेला


'केसरी' मध्ये अक्षय कुमारनं हवालदार ईश्वर सिंहची भूमिका साकारली होती. त्यात सारागढीच्या लढाईचं चित्रण होतं, ज्यामध्ये 21 शिखांनी आपले प्राण दिले होते. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता, 'केसरी 2' मध्ये, एक वेगळी आणि कधीही न ऐकलेली कहाणी पाहायला मिळेल, काळजाच चर्र करणारा ट्रेलर पाहून चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत.                     


दरम्यान, Kesari Chapter 2 - The Untold Story Of Jallianwala Bagh फिल्म येत्या 18 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज केली जाणार आहे. 18 एप्रिल 2025 रोजी वर्ल्डवाइड रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंह त्यांगी यांनी केलं आहे. अक्षय कुमार आणि आर. माधवन दिसणार आहेत. कोर्टात ब्रिटीश साम्राज्याकडून आर. माधवन खटला लढणार आहेत. तसेच, या चित्रपटात अनन्या पांडेची झलक पाहायला मिळणार आहे.   


पाहा ट्रेलर :