बीड : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वेगळं वळण मिळत असल्याचं चित्र आहे. धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर त्यासंबंधी एक दावा केला होता. त्या दाव्याला धनंजय देशमुखांनी बळकटी देणारं वक्तव्य केलं. संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी बोलावण्यात आलं होतं, असा दावा धनंजय देशमुखांनी केला. 

Continues below advertisement

भाजप आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख आणि त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. मस्साजोग गावात होणाऱ्या चोऱ्या घरफोडी आणि विविध विषयांवर पोलीस अधीक्षक कार्यालयात तासभर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. 

खिंडकरांच्या दाव्याला दुजोरा

धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी त्यांच्यावरील असलेल्या गुन्ह्यातून सोडण्यासाठी सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची केस मागे घेण्यासंदर्भात समेट घडून आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला होता. याला धनंजय देशमुख यांनी दुजोरा दिला.

Continues below advertisement

धनंजय देशमुख म्हणाले की, "संतोष देशमुख प्रकरण मिटवण्यासाठी मला एका जागेवर बोलावून घेण्याचं षडयंत्र होतं. त्यातील एका साक्षीदाराने बोलावून घेऊन हे प्रकरण मिटवू असे म्हटलं. मात्र त्यांनी ज्या ठिकाणी बोलावलं तिथे मी गेलो नाही. दादासाहेब खिंडकर प्रकरणाची तुलना संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी करण्यात आली. मी 13 महिन्यानंतर यावर बोलत आहे. माझी बदनामी, खच्चीकरण कसे होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी न्यायासाठी लढत आहे आणि लढत राहीन."

मस्साजोग गावची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती. परंतु लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, असंही धनंजय देशमुख म्हणाले. 

काय म्हणाले होते दादासाहेब खिंडकर? 

धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर हे 13 महिन्यानंतर तुरुंगातून सुटून बाहेर आहे. त्यानंतर त्यांनी संतोष देशमुख प्रकरणी मोठा दावा केला. जुन्या व्हिडीओच्या आधारे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि फसवण्यात आले. त्यानंतर आपल्यावरी गुन्हा मागे घेण्यासाठी संतोष देशमुखांची केस मागे घ्यावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, असा दावा दादासाहेब खिंडकर यांनी केला. 

आपल्यावर ज्यांनी खोटे आरोप केले ते लोक नशाबाज आणि गुंड असल्याचा दावाही खिंडकरांनी केला. त्या नशाबाज लोकांनी गावातल्या अनेक लोकांवर खोटे गुन्हे नोंद त्रास दिल्याचं ते म्हणाले. 

ही बातमी वाचा: