Nanded News : नांदेड रेल्वे स्थानकासमोर (Nanded) असणाऱ्या पंजाब लॉजमध्ये (Punjab Lodge) गळा आणि हात चिरलेल्या अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला आहे. संबधित महिला पेशाने डॉक्टर आहे. नांदेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार डॉ. विद्या अमोल सुंकवाड असे मृत महिला डॉक्टरचे नाव असून ती नांदेड जिल्ह्यातील भोकर (Bhokar) येथील रहिवासी आहे. दरम्यान सदर महिला 23 मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार भोकर पोलिसांत देण्यात आली होती. त्यानंतर आता तिचा मृतदेह आढळून आला आहे.


दरम्यान लॉजमधील ज्या रूममध्ये सदर महिलेचा मृतदेह आढळला ती रूम आतून बंद करण्यात आली होती. तर मृत महिलेच्या गळ्यावर आणि हातावर कटरने जखमा केल्या होत्या. ज्यानंतर कटर मृत महिलेच्या हातात असल्याने ही आत्महत्या असल्याची प्राथमिक माहिती वाजीराबाद पोलिसांनी दिली आहे. पण मृत महिलेच्या लॉजमधील रूममध्ये मिळालेले दोरी, विविध औषध, कटर हे साहित्य आणि मृतदेहावरील जखमा यामुळे या घटने विषयी संशय व्यक्त केला जात आहे. तर शहरातील मुख्य वस्तीत झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये ही विविध चर्चांना उधाण आलं आहे. पण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर महिलेने आत्महत्या केल्या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद वाजीराबाद पोलिसात करण्यात आली आहे.


हे ही वाचा-



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live