Dadar Suitcase Case: मुंबई : मुंबईतील (Mumbai News) सर्वात वर्दीळीचं रेल्वे स्थानक म्हणजे, दादर. याच दादर रेल्वे स्थानकात (Dadar Railway Station) काही दिवसांपूर्वी एका सूटकेसमध्ये मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच या प्रकरणाचा शोध लावत आरोपींना ताब्यात घेतलं खरं, पण आरोपींकडून गुन्हा कबुल करुन घेणं, तसं पोलिसांसाठी फारसं सोपं नव्हतं. दिवसेंदिवस गुंता वाढतच चालला होता. पोलिसांनी सगळे मार्ग अवलंबले पण काही केल्या गुंता सुटत नव्हता. अखेर एका पोलिसाच्या मूक मुलानं दादर रेल्वे स्थानकावरील हत्येचा गुंता सोडवण्यासाठी मदत केली. पोलिसांसाठी अत्यंत आव्हानात्मक असलेल्या या प्रकरणाचा छडा लागला. 


मुंबईच्या कायमच गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी बँगेत मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. अनैतिक संबधातून झालेल्या या हत्येत आरोपी जय चावडा हा मूकबधीर असल्यानं त्याची भाषा पोलिसांना समजत नव्हती. यामुळे रेल्वे पोलिसांच्या एकूणच तपासाला खिळ बसली होती. या हत्येचा गुंता सोडवण्यासाठी रेल्वे पोलीस मूक बधिर लोकांच्या साईन लॅगवेजची माहिती असलेल्या व्यक्तीचा शोध घेत होते. मध्यरात्र होती, त्यामुळे आता कोण येईल? असा प्रश्न होताच. पण तेवढ्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या राजेश सातपुते यांचा मुलगा गौरव याच्या मदतीनं या हत्येचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आलं. 


नेमका हा हत्येचा गुंता सुटला कसा? याबाबत पोलीस नाईक राजेश सातपुते यांच्याशी ABP Majha नं Exclusive  बातचीत केली, त्यांनी हत्येचा गुंता नेमका कसा सोडवला? याबाबत सांगितलं आहे... 


दादर स्थानकावर आरोपी जय चावडा याच्या एकूणच हालचालीवर संशय आल्यानं पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या बॅगेची झडती घेतली. बॅग उघडताच त्यातील मृतदेह पाहून पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी बॅग घेऊन जाणारा आरोपी जय चावडा याला ताब्यात घेतलं आहे. त्यात जय हा मूकबधीर असल्याचं कळाल्यानंतर पोलिसांना त्याची भाषा कळतच नव्हती. पोलिसांच्या संपूर्ण तपासाला या ठिकाणी खिळ बसली होती. रेल्वे पोलीस दादर परिसरात मध्यरात्री 2 वाजता मूक बधिरांच्या शाळेचा पत्ता शोधत असताना. RAK पोलिसांच्या नाकाबंदीत रेल्वे पोलिसांनी पोलीस नाईक राजेश सातपुतेंकडे चौकशी केली. शाळेचा पत्ता सातपुतेंनी दिला. मात्र, एवढ्या रात्री का बरं या शाळेचा पत्ता मागत आहात? याबाबत सातपुतेंनी रेल्वे पोलिसांकडे चौकशी केली.


रेल्वे पोलिसांनी जय चावडा यांच्याविषयी माहिती सांगत, तो मूकबधीर आहे. त्याची भाषा समजण्यासाठी व्यक्तीची गरज असल्याचं सांगताच, सातपुते यांनी मी काही मदत करू शकतो का? अशी विचारणा केली. रेल्वे पोलिसांनी तुम्ही कशी मदत करणार? असं विचारताच सातपुते यांनी माझा मुलगाही मुका असून त्याला साईन लॅग्वेजची महिती आहे. रेल्वे पोलिसांनी क्षणाचाही विचार न करता रात्रीच्या 2 वाजता राजेश सातपुते आणि त्यांचा मुलगा गौरवला घेऊन दादर रेल्वे पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी गौरवला आरोपी जय चावडाला विचारणयसाठी काही प्रश्न दिले ते साईन लॅगवेजच्या माध्यमातून, गौरवनं चावडाला विचारताच चावडानंही त्यांच्या सांकेतिक भाषेत उत्तरं दिलं. गौरवनं ते राजेश यांना सांगितलं. मग पुढे राजेश ते रेल्वे पोलिसांना सांगत होते.


अवघ्या अर्ध्या तासाच गौरवनं चावडाला बोलतं केलं, पोलिसांना मिळालल्या माहितीच्या आधारे इतर आरोपींची पुढे काही तासांत धरपकड करत, या हत्येचा गुंता पोलिसांनी सोडवला. 


VIDEO : पोलिसाच्या मूक मुलाने दादर सुटकेस हत्याकांडाचा गुंता सोडवला



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Dadar Suitcase Case : दादर हत्याप्रकरणाचं बेल्जियम कनेक्शन? अर्शदला हातोडीनं मारताना व्हिडीओ कॉल, शिवजित म्हणाला, "काम हो गया"