Cyber Crime : चीनच्या (China) सायबर ठगांनी बनावट कर्ज अर्जाद्वारे कोट्यवधी रुपये तसेच कोट्यवधी भारतीयांचा डेटा चोरला असल्याची माहिती मिळत आहे. आता हे चिनी हॅकर्स पुन्हा त्या डेटाचा वापर करुन लाखो भारतीयांवर हल्ला करु शकतात, अशीही भिती व्यक्त केली जात आहे. 


मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी ठगांनी चोरलेला हा डेटा चीन आणि हाँगकाँगमधील सर्व्हरमध्ये लपवून ठेवला आहे. जेणेकरून ते पुन्हा त्याचा वापर करू शकतील.


मुंबई सायबर सेलचे डीसीपी हेमराजसिंह राजपूत यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधताना सांगितलं की, आपल्याला घाबरण्याची गरज नाही. डेटा वापरू शकतात आणि आम्ही आपल्या मोबाईलमधील लोन अॅप्स तात्काळ डिलीट करावे. तसेच, जेवढे अॅपलिकेशन्स मोबाईलमध्ये आहेत, खासकरुन ऑनलाईन पेमेंट अॅप्लिकेशन्स तात्काळ हटवले पाहिजेत. 


जेव्हा आपण कोणतंही अॅप्लिकेशन डाऊनलोड करतो, तेव्हा तीन गोष्टी विचारल्या जातात. don't allow, allow while using app आणि सेटिंग्जमध्ये जाऊन allow while using app या पर्यायावर क्लिक करावं. जेणेकरुन इतर कोणीही त्यात प्रवेश करू शकत नाही.


सूत्रांचं असं म्हणणं आहे की, चिनी हॅकर्स एकदा सेव्ह केलेल्या डेटाचा वापर करुन पुन्हा पुन्हा बँक खात्यातील पैसे लंपास करण्यासाठी वापर करु शकतात. जर त्यांचा हा हेतू सफल झाला तर ही इतिहासातील सर्वात मोठी चोरी असेल. कारण ही चोरी एकाच वेळी देशातील लाखो बँक अकाउंट्समध्ये होईल. 


मुंबई सायबर सेलचे डीसीपी हेमराजसिंह राजपूत यांनी बोलताना सांगितलं की, "जेव्हा आपण अशा प्रकारचं बोगस लोन अॅप डाऊनलोड करतो, तेव्हा आपण त्या अॅपला आपल्या मोबाईलमधील कॅमेरा, गॅलरी आणि मायक्रोफोनचा एक्सेस देतो. त्यामुळे हॅकर्स जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपल्याला ऐकू आणि पाहू शकतात. किंवा आपल्या खाजगी गोष्टी मिळवू शकतात. 


दिवसागणिक बोगस लोन अॅप्सची संख्या वाढतीच 


राजपूत म्हणाले की, आम्ही Google वरून 200 हून अधिक कर्जाचे अर्ज हटवले आहेत, त्यानंतर सायबर ठगांनी लोकांना लिंक पाठवण्यास सुरुवात केली आणि थेट अॅप डाऊनलोड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की, Google Play Store वरून हटवलेले लोन अॅप्स पुन्हा नवीन नावानं दिसत आहेत आणि ही चिंतेची बाब आहे. कारण बरेच लोक अजूनही ते डाऊनलोड करत आहेत. आम्ही या संदर्भात गुगलशी बोललो आहोत आणि आम्ही हे अॅप्लिकेशन्स पुन्हा डिलीट करण्याचा प्रयत्न करत आहोत. 


बनावट लोन अॅप्सच्या संदर्भात आतापर्यंत झालेली कारवाई 



  • या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या वेळी 18 जणांना अटक केली आहे.

  • या प्रकरणात आम्ही 350 हून अधिक बँक खाती गोठवली असून, त्या बँक खात्यांमध्ये 17 कोटींहून अधिक रक्कम आहे.  ही सर्व खाती फ्रिज करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. 

  • चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी क्रिप्टो वॉलेट्सही तयार करुन ठेवले आहेत. त्यातूनच पैसे क्रिप्टो करन्सीमध्ये कन्वर्ट करण्याचा त्यांचा कट आहे. 

  • चौकशी दरम्यान, पोलिसांनी वेगवेगळ्या क्रिप्टो व्हॉलेट्स फ्रिज केले आहेत. विशेष बाब म्हणजे, जे व्हॉलेट्स फ्रिज करण्यात आले आहेत, त्यामध्ये 9 कोटींहून अधिक रक्कम आहे. 

  • पोलिसांनी आतापर्यंत 300 हून अधिक लोन अॅप्स शोधून काढले आहेत. त्यानंतर ते त्वरित बंद करण्यात आले आहेत. 

  • आरोपी बनावट अॅप्स तयार करण्यासाठी कंपनी तयार करतात आणि पोलिसांनी अशा 200 हून अधिक कंपन्या केल्या आहेत.