Crime News : डोंबिवलीत गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका स्पोर्ट्स कोचने विद्यार्थिनीवर अत्याचार करत तिला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून मानपाडा पोलिसांनी या कोचला बेड्या ठोकल्यात आहेत. रामेश्वर पाठक असे संशयिताचे नाव आहे. 

Continues below advertisement

डोंबिवलीत राहणारी 27 वर्षीय पीडित तरुणी 2012 साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. यावेळी तिचा कोच असलेल्या रामेश्वर पाठक याने त्या तरुणीसोबत ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. काही कालावधीनंतर  दुसऱ्या मुलांशी बोलते म्हणून रामेश्वर हा या तरुणीला मारहाण करू लागला. या तरुणीला रामेश्वर याने 18 मार्च 2022 रोजी डोंबिवलीत रॉडने अमानुष मारहाण केली. या मारहाणीत पीडित तरुणीचा पाय फ्रॅक्चर झाला. 

मारहाणीनंतर पीडित तरूणीला अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं. अखेर या तरुणीने एका सहकाऱ्याच्या मदतीने मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. यानंतर मानपाडा पोलिसांनी रामेश्वर पाठक याच्याविरोधात बलात्कार, गंभीर मारहाण यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

Continues below advertisement

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. परंतु, गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेबाबत परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा योग्य तपास करून दोषीला जास्तीत-जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

महत्वाच्या बातम्या