Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) एका सहा महिन्यांच्या बाळाच्या चोरीचं प्रकरण समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शनंही समोर आलं आहे. मध्य प्रदेशातून ज्या बाळाचं अपहरण झालं, त्या बाळाचं अपहरणकर्ते हे महाराष्ट्रातील होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर आरोपींकडून सहा महिन्यांचं बाळही ताब्यात घेतलं असून बाळ सुरक्षीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींमध्ये चार पुरुषांसह दोन महिलांचाही समावेश होता. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींपैकी एक व्यक्ती मुंबईतील प्रसिद्ध लिलिवाती रुग्णालयात मदतनीस म्हणून कार्यरत आहे. 


मध्य प्रदेशात एका सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झालं. ज्यावेळी पोलिसांनी अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे याप्रकरणात झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एका शिक्षकाला सहा महिन्याचं बाळ पाहिजे होतं. त्यासाठी त्यानं आरोपींना 29 लाख रुपये दिले होते. या प्रकरणात कल्याण पोलिसांनी एकूण सहाजणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये मुंबईतील लिलावती रुग्णालयात काम करणारा मदतनीस, शेअर बाजारात काम करणाऱ्याची पत्नी, एक रिक्षा चालक आण रिक्षा चालकाच्या शेजारी राहणाऱ्यांचा समावेश आहे. 


नेमकं काय घडलं होतं? 


मध्य प्रदेश येथील रिवा जिल्ह्यातील सीव्हल लाईन पोलीस ठाण्यच्या हद्दीतून रस्त्यावरुन एका बाळाचं अपहरण झालेलं. फेरीचं काम करणारं एक दांम्पत्य रस्त्यावरील फूटपाथवर झोपलं होतं. त्याचवेळी दोन बाईक स्वार या दप्म्पत्याजवळ आले. त्यांनी सहा महिन्याच्या बाळाला जबदरस्तीनं उलचून पळ काढला. ज्यांचं बाळ चोरीला गेलं होतं. ते लोक फेरीचा धंदा करतात. त्यांनी या प्रकरणाची तक्रार सीव्हील लाईन पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी त्वरीत 400 सीसीटीव्हीच्या सहाय्यानं बाळाच्या अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. आरोपींनी बाळ महाराष्ट्रात पाठवलं होतं. कल्याणला राहत असलेल्या नितीन सानी आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याकडे बाळाला पाठवण्यात आलं होतं. 


कसा रंगला बाळाच्या सुटकेचा थरार? 


सानी दांम्पत्य कल्याणला राहतात अशी महिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरीत कल्याण पोलिसांशी संपर्क साधला. मध्य प्रदेश पोलिसांनी थेट कल्याण गाठलं. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे आणि खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ.अमरनाथ वाघमोड यांनी सहा महिन्याच्या बाळाच्या सुटकेसाठी सहा पथके तयार केली. कल्याणच्या खडकापाडा पोलिसांनी नितीन आणि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांनी सांगितलं की, हे बाळ आमच्या शेजारी राहणारे रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला देण्यात आलं आहे. पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतलं. प्रदीपनं सांगितलं की, हे बाळ अमोल येरुणकर आणि त्याची पत्नी अर्वी येरुणकरला देण्यात आलं आहे. पोलिसांनी येरुणकर पती पत्नीला ताब्यात घेतलं. त्यांनी सांगितलं की, सहा महिन्याचं बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिलं आहे. पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या बाळाची सुटका केली. 


सहा जणाच्या अटकेनंतर सहा महिन्याच्या बाळाच्या अपहरणची कहाणी समोर आली. ही थरार ऐकून पोलीस देखील चक्रावलेत. रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक पाटील यांना वयाच्या 53 वर्षीही मुल झालं नव्हतं. त्यांनी आपल्या एका ओळखीचा व्यक्ती जो एकेकाळी त्यांचा विद्यार्थी होता. अमोल येरुणकरला सांगितलं, काय पण करुन एक बाळ घेऊन दे. ते बाळ सहा ते सात महिन्यांचं हवं आणि ते रंगानं गोरंही असलं पाहिजे, अशा अटीशर्थी घातल्या.


अमोल हा मुंबईतील नामांकित लिलावती रुग्णलायात मदतनीस आहे. रुग्णालयातून बाळ मी चोरी करुन देतो, असं आश्वासन अमोल यानं शिक्षक पाटील यांना दिलं होतं. त्यासाठी अमोलनं पाटील यांच्याकडून 29 लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर बाळ काही मिळत नव्हते. अमोल यांनी शेअर बाजारात काम करणारी त्यांची पत्नी अर्वीला सांगितलं. अर्वी दररोज ज्या रिक्षानं प्रवास करत होती. त्या रिक्षा वाल्याला एक बाळाची गरज आहे, असं सांगितलं. त्याबदल्यात भरपूर पैसे मिळतात. रिक्षा चालकानं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सोनी दांपत्यास पैशाचं आमिष दाखवून एक बाळ उपलब्ध करुन द्या, असं सांगितलं. सोनी दांपत्य हे मध्य प्रदेशच असल्यानं  त्यानं रिक्षा चालकासोबत जाऊन मध्य प्रदेशात जाऊन रेकी केली. बाळाच्या अपहरणाचा कट रचला. येरुणकर कुटुंबीयांनी बाळासाठी घेतलेल्या पैशातून एक फ्लॅट विकत घेतला आहे. या सहा आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाली केले आहे. बाळालाही मध्य प्रदेश पोलिसांकडे सूपूर्द केले आहे. पोलिसांनी बाळाला त्याच्या आई वडिलांच्या हवाली केलं आहे.


आधी पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतलं. प्रदीप कोळंबे यानं सांगितलं की, माझ्या शेजारी राहणारा नितीन सोनी आणि त्याची पत्नी स्वाती सोनी उर्फ मेहक खान यांना सहा महिन्यांचं बाळ दिलं आहे. सहा महिन्यांचं बाळ आर्वी येरूणकर आणि अमोल येरूणकर या दाम्त्याला देण्यात आलं आहे. जेव्हा पोलिसांनी या पती पत्नीला ताब्यात घेतलं आहे.