Crime News नालासोपारा: नालासोपाऱ्यात 32 वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सदर प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात दोन नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही आरोपी फरार आहेत.
32 वर्षीय पीडित महिला ही 10 सप्टेंबरला रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुलाला घराच्या बाजूला बोलविण्यासाठी गेली होती. तेव्हा तेथील एका आरोपीने तिच्या पाठीमागून येऊन महिलेच्या डोक्याचे केस पकडून एका हाताने तोंड दाबले. त्यानंतर एका गल्लीतून खेचत नेऊन एकाच्या रुममध्ये घेऊन जावून दुसरा आरोपीने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरीक संभोग केल्याची पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आरोपींनी धमकीही दिली-
सदर प्रकार जर कोणास सांगितला, तर जीवे ठार मारण्याची धमकी दोन्ही आरोपींनी त्यांना दिली. शेवटी शनिवारी पीडित महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
10 सप्टेंबर रोजी पीडित महिला रात्री 9.15 च्या दरम्यान घराच्या बाजूला मुलाला बोलावण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने महिलेच्या पाठीमागून येऊन डोक्याचे केस पकडून तिचे तोंड दाबले. यानंतर महिलेला खेचत एका खोलीत घेऊन गेला. तर दुसऱ्या आरोपीने पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला. सदर घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या हे दोघंही फरार असल्याची माहिती समोर आली.
मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवण्याचा आग्रह-
मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक पोलीस विभागात ही महिला पोलीस कार्यरत होती. अनघा ढवळ असं आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे. इन्स्टा स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. पीडित महिलेने याबाबत कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अनघा ढवळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी अनघा सुनील ढवळे हिची कोथरुडच्या वाहतूक पोलीस विभागात नेमणूक करण्यात आली होती. ढवळे हिने तिच्या मित्राच्या पत्नीला तू परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेव, अन्यथा तुझ्या घरातील लोकांना ठार मारु, अशी धमकी दिली होती. दरम्यान, महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर ढवळेचे निलंबन करण्यात आले आहे.