Chhattisgarh : माओवाद्यांनी दोन जणांना फासावर लटकवल्याची खळबळजनक घटना छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात घडली आहे. बिजापुरातील जप्पेमरका परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दोघांवर माओवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप ठेवला होता. 


दोन दिवसांपूर्वी माओवाद्यांनी तिघांचे केले होते अपहरण 


बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड पोलीस स्टेशन अंतर्गत जप्पेमरका परिसरात दोन दिवसांपूर्वी माओवाद्यांनी तिघांचे अपहरण केले होते. अपहरण करण्यात आलेल्या तिघांवर पोलिसांसाठी खबरी म्हणून काम करतात, असा आरोप ठेवत जनअदालत लावण्यात आली होती. या जन-आदालतच्या माध्यमातून माडवी सुजा आणि पोडियम कोसा या दोन गावकऱ्यांवर ते पोलिसांचे खबरी असल्याचा आरोप ठेवण्यात आला.  त्यांना फाशीची शिक्षा सुनावत त्वरित त्यांना फासावर लटकवून जीवे मारण्यात आले.


तिसरा तरुण पोडियम हिडमाला माओवाद्यांनी सोडून दिले


या प्रकरणात तिसरा तरुण पोडियम हिडमाला माओवाद्यांनी सोडून दिले आहे. ओवाद्यांच्या भैरमगड एरिया कमिटीने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली आहे. माओवाद्यांनी दोन जणांना फासावर लटकवल्याची खळबळजनक घटना छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात घडली आहे. बिजापुरातील जप्पेमरका परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दोघांवर माओवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप ठेवला होता.


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी! ऑडी हिट अँड रन प्रकरणाला नवं वळण, अपघातावेळी गाडी चालवणाऱ्याचे वडील काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचं समोर