नांदेड : भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सून मिनल खतगावकर यांचा काँग्रेस पक्षातील प्रवेश निश्चित झाला आहे. काँग्रेस प्रवेशाबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांच्या गटाच्या वतीने बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे कार्यकर्त्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मीनल खतगावकर नायगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्याचा ठराव एकमताने पारित झाला.
भास्करराव खतगावकर म्हणाले की, "नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर आपल्याला भाजपकडून प्रस्ताव आला होता. मीनल खतगावकर यांनी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवावं असा भाजपाचा प्रस्ताव होता. पण मी हात जोडून नकार दिला. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँगेसकडून दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा ठराव पारीत केला. काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आम्हाला निरोप आला की नायगावमधून मीनल खतगावकर यांना उभं करा." दरम्यान, भास्करराव खतगावकर हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. आता त्यांच्या प्रवेशाची निश्चिती झाली आहे.
अशोक चव्हाण यांच्याकडून अपेक्षा भंग - खतगांवकर
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्या सूनबाईला आमदार बनवण्यासाठी खतगावकर यांनी हा निर्णय घेतलाय, असे स्वतःच त्यांनी जाहीर केलंय. मात्र, याबाबत एबीपी माझाशी बोलताना खतगांवकर म्हणाले की, विकासाबाबतीत अशोकरावांकडून अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होऊ शकत नसल्याने आपण काँग्रेसमध्ये जात असल्याचा दावा केलाय. काँगेस प्रवेशाबाबत निर्णय घेण्यासाठी आज बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खतगावकर यांनी हा निर्णय जाहीर केला. नायगाव मधून मीनल खतगावकर यांना उभं करा असा काँग्रेसच्या वरिष्ठांकडून निरोप आल्याचे खतगावकर म्हणाले. भाजपने तीन वेळा उमेदवारी डावलली त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे खतगावकर म्हणाले. त्यांच्या सून मीनल खतगावकर यांना काँग्रेसकडून नायगाव मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
ही बातमी वाचा :