Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातून अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीने चक्क न्यायधीशांच्या दिशेने चप्पल फेकून मारल्याचा (Chhatrapati Sambhajinagar Crime) प्रकार घडला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील हि घटना असून या कृत्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement


मिळालेल्या माहितीनुसार, पोक्सो प्रकरणातील आरोपीने जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या दिशेने हि चप्पल फेकल्याचा (Crime) प्रकार घडला आहे. या घटनेनंतर न्यायालयात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. अंतोन शामसुंदर गायकवाड असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तर प्रकरण वर्ग न झाल्याचा राग आल्याने त्याने चक्क चप्पल फेकून मारल्याचा प्रकार केला असल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुढील कारवाई सुरु आहे.


महसूल अधिकाऱ्यांसमक्ष विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या


छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतात नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याने महसूल अधिकाऱ्यांसमक्ष विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातील खादगाव येथील घटना असून, संजय शेषेराव कोहकडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दोन्ही बाजूंनी नालीचे खोदकाम झाल्याने त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. तसेच शेतात पाणी साचू लागले. त्यांनी याबाबत अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मंगळवारी अधिकारी पंचनामा करत असताना कोहकडे यांनी आपली व्यथा सांगितली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांनाच झापल्याने ते संतापले. त्यांनी थेट विहिरीकडे धाव घेत अधिकाऱ्यांसमोरच उडी घेतली. काहींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मृत्यू झाला होता.


कर्नाटकात दरोडा, मंगळवेढ्यात सापडली चोरट्यांची गाडी


कर्नाटकात दरोडा टाकून आलेली चोरट्यांची एक गाडी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे पोलिसांना मिळून आली. ही गाडी रस्ता चुकून हुलजंतीत गेली असता एका गाडीला धडकली. यानंतर ग्रामस्थांनी या गाडीचा पाठलाग सुरू केल्यावर यातील एका चोरट्याने बंदुकीचा धाक दाखवत गाडी सोडून बॅग घेऊन पळून गेला. ग्रामस्थांनी गाडी अडवून ठेवली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. याच ठिकाणी आता कर्नाटकचे पोलीस अधिकारीही पोचले असून तपास सुरू करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या चोरट्यांचे चोरलेल्या रकमेचे वाटप झाल्यावर यातील एक जण हुलजंतीच्या दिशेने आला असावा आणि त्यावेळी रस्ता चुकल्याने त्याच्या गाडीची एका गाडीला धडक बसली आणि नंतर ग्रामस्थ मागे लागल्यावर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून तो पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे समजते. दरम्यान, मंगळवेढा पोलीस आणि कर्नाटक पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून या गाडीत नेमकी किती रक्कम होती आणि या चोरट्याकडे बॅगेत किती रक्कम घेऊन तो पळाला याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.


हेही वाचा