Chhatrapati Sambhajinagar : पुण्यातील 'हिट अँड रन'चे प्रकरण ताजे असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) असाच प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) मुलांनी वाडगावात येत बाप लेकाला उडवल्याची घटना आज (दि.27) घडली आहे. ही गाडी एका राजकीय नेत्याची असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. अपघातग्रस्त बाप लेकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल
वाडगावात बाप लेकाला राजकीय नेत्यांच्या गाडीने उडवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त बाप लेकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या टायरांचा अक्षरश: चक्काचूर झालाय.
इतर महत्वाच्या बातम्या