Anant Ambani Radhika Merchant Second Pre Wedding :  अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या दुसऱ्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंब रवाना झाले आहे. मार्च महिन्यात अनंत आणि राधिकाचा पहिला प्री वेडिंग सोहळा हा जामनगर येथे पार पडला होता. त्यानंतर आता दुसरा प्री वेडिंग सोहळा हा परदेशात क्रूजवर होणार आहे. फक्त 800 माणसांच्या उपस्थित हा सोहळा रंगणार आहे. त्यासाठी बॉलीवूडकरही रवाना झालेत. दरम्यान या पहिल्या प्री वेडिंगमध्ये कोलंबियन गायिका शकिरा (Shakira) हा फरफॉर्मन्स करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


राधिका आणि अनंतच्या पहिल्या प्री वेडिंगमध्ये रिहानाच्या परफॉर्मन्सने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. अवघ्या काही मिनिटांचा परफॉर्मन्स करण्यासाठी अंबानींनी रिहानाला 74 कोटी रुपयांचं मानधन दिलं असल्याची माहिती मिळाली होती. त्यातच आता या दुसऱ्या प्री वेडिंगमध्ये वाका वाका फेम शकिरा परफॉर्मन्स करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


शकिराला किती मानधन देणार


शकिरा ही कोणत्याही खासगी कार्यक्रमांसाठी जवळपास 10 ते 15 कोटी रुपयांचे मानधन घेते. त्यातच रिहानाला परफॉर्मन्ससाठी 74 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यामुळे शकिराला देखील तेवढचं किंवा त्याच्या आसपास मानधन देणार असल्याची माहिती समोर येत आहे.  त्यामुळे शकिरा देखील तिच्या परफॉर्मन्ससाठी कोट्यावधी रुपयांचं मानधन घेणार असल्याचही म्हटलं जातंय. 


पार पडणार अनंत-राधिकाचं दुसरं प्री वेडिंग


देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. मार्च महिन्यापासून त्यांच्या प्री-वेडिंगला सुरुवात झाली आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये मार्च महिन्यात तीन दिवस ग्रँड प्री-वेडिंग पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा अनंत-राधिका दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन इटलीतील क्रूजवर करायला सज्ज आहेत. 29 मे ते 1 जूनपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. त्यासाठी बॉलिवूडदेखील पुढील काही दिवसांसाठी बंद असणार आहे. सलमान खानपासून (Salman Khan) आलिया भट्ट (Alia Bhatt) ते रणबीर कपूरपर्यंत (Ranbir Kapoor) अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमासाठी इटलीला रवाना झाले आहेत.  


ही बातमी वाचा : 


Anant Ambani Radhika Merchant : अंबानींची बातच न्यारी! अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला बॉलिवूड बंद! आलिया-रणबीर ते सलमान-धोनीपर्यंत; दिग्गज मंडळी इटलीला रवाना