Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) एक धक्कादायक घटना समोर आला असून, मी या एरियाचा दादा असल्याचे म्हणत एका गुंडाने हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. एवढंच नाही तर या गुंडाने चाकू खुपसून एका तरुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न देखील केला. दरम्यान या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय ठाकूर, अरुण शिंगारे व संतोष खरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा परिसरात राहणारा लक्ष्मण कांबळे (वय 25 वर्षे) हेा बीड बायपास येथील एका हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. दरम्यान याच हॉटेलमध्ये अजयसह अन्य दोन साथीदार तेथेच उपस्थित होते. मात्र अजयने अचानक लक्ष्मणच्या दिशेने जात धमकावण्यास सुरुवात केले. 'मी साताऱ्याचा दादा आहे, सातारा परिसरात दिसू नको. मी अट्टल गुन्हेगार असून, माझ्या नादी लागायचे नाही, असे म्हणत धमकावले. वाद वाढू नये म्हणून लक्ष्मण हा जेवण आटोपत घेऊन हॉटेलच्या बाहेर पडला. 


मात्र, तिघांनी अचानक पाठीमागून जात त्याची कॉलर पकडून त्याला हाताने मारहाण केली. दरम्यान यावेळी अजयने 'आजच तुझा गेम करतो', असे म्हणत चाकूने वार केले. त्यानंतर अंगावर बीयरच्या बाटल्या देखील फोडल्या. यात लक्ष्मण जखमी झाला आहे. दरम्यान अजयने हल्ला केल्यानंतर लक्ष्मणच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी तिथून पळ काढला. त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत लक्ष्मण रुग्णालयात पोहोचला आणि उपचार घेतले. उपचार घेतल्यावर त्याने सातारा पोलिसांकडे तक्रार दिली. 


अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय ठाकूर काही महिन्यांपूर्वीच एमपीडीएच्या कारवाईत वर्षभर कारागृहात राहून आला आहे. शिवाय, त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गारखेड्यातील स्वयंघोषित एका गुंडासोबत त्याची मैत्री असल्याचे त्याची परिसरात दहशत आहे. तर कारागृहातून बाहेर आल्यावर पुन्हा त्याने डोके वर काढल्याची चर्चा सातारा परिसरात आहे.


थेट चाकू हल्ला केला.... 


लक्ष्मण कांबळे हा आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. दरम्यान याचवेळी तिथे उपस्थित असलेला गुंड अजयने त्यांच्यासोबत वाद घातला. एवढंच नाही तर शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. दरम्यान हे कमी होते की काय त्यानंतर अजयने लक्ष्मण याच्यावर थेट चाकू हल्ला केला. तसेच त्यानंतर अंगावर बीयरच्या बाटल्या देखील फोडल्या, ज्यात लक्ष्मण झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


संतापजनक! पन्नास रुपयांचे आमिष दाखवत वडिलांच्या मित्रानेच केला सात वर्षीय चिमुकलीवर बलात्कार