Anupama Serial Latest Update : 'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. समर आणि डिंपलच्या लग्नानंतर अनुपमा आता अमेरिकेला जाणार आहे. दरम्यान ती कुटुंब, प्रेम आणि आश्वासनांमध्ये गोंधळलेली दिसत आहे.
'अनुपमा' मालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात पाहायला मिळालं की, एकीकडे डिंपलचा गृहप्रवेश होत असताना शाह हाऊसमध्ये नव्या नाट्याला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे अनुज अनुपमाला भेटायला बोलवतो आणि त्याचवेळी गुरु मांने पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं असतं. तसेच शाह हाऊसमध्ये समर आणि डिंपलसाठी पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनुपमाला नक्की कुठे जायचं हे कळत नाही.
'अनुपमा' प्रेमापेक्षा कर्तव्याची निवड करणार
'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात बा अनुपमाला फोन करुन रडताना दिसणार आहे. बा अनुपमाकडे डिंपलची तक्रार करत म्हणते की,"डिंपलच्या येण्यानेच मला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यावेळी अनुपमा बाला शांत करत म्हणते की,"मी सर्वकाही ठिक करेल". त्यानंतर अनुपमा अनुजला फोन करत म्हणते की,"मी प्रेमापेक्षा कर्तव्याची निवड करणार आहे".
'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) असे या मालिकेचे नाव आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातही ही मालिका सुपरहिट आहे.
रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्नाची (Gaurav Khanna) 'अनुपमा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आहे. मालिकेतील रंजक वळणांचा टीआरपीवर परिणाम झाल्याचं म्हटलं जात आहे. या आठवड्यात मालिकेला 2.9 रेटिंग मिळाले आहे. रुपाली गांगुलीने 'अनुपमा' हे पात्र जिवंत केलं आहे. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे.
'अनुमपा' या मालिकेच्या माध्यमातून रुपाली गांगुली घराघरांत पोहोचली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये रुपालीची गणना होते. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी रुपाली गांगुली तीन लाख मानधन घेते.
संबंधित बातम्या