Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : अनकेदा जवळच्या लोकांकडून दगाबाजी झाल्याने माणसाला दुःख होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) याच दुःखातून एकाने आत्महत्या (Suicide) करत जीवन संपवलं आहे. जवळच्या मित्राकडून फसवणूक (Cheating)  झाली,  हा धक्का सहन न झाल्याने बँकेच्या व्यवस्थापकाने (Bank Manager) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 'मित्रा, फक्त माझ्यासारखे फसवू नको कोणाला. तुला हाथ जोडून सांगतो,' असे व्हॉट्सअपला स्टेटस (Whatsapp Status) ठेवून या तरुणाने आत्महत्या केली आहे. विठ्ठल मधुकर सदार (वय 28 वर्ष, रा. खडकी सदार ता. रिसोड जि. वाशीम) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण बँक मॅनेजरचे नाव आहे. 


अधिक माहितीनुसार, “वाशीम जिल्ह्यातील विठ्ठल सदार हा शिक्षणासाठी काही दिवसांपूर्वी शहरात आला होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतांना दोन वर्षांपूर्वी एका खाजगी बँकेत त्याला असिस्टंट मॅनेजर पदावर नोकरी लागली. विठ्ठल हा मित्रांसह नारळीबाग जुना बाजार वरखेड लक्ष्मी माता मंदिर शेजारील रूममध्ये राहत होता. त्याच्यासोबत राहणारे मुलं देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. दरम्यान, नेहमीप्रमाणे इतर तिघे जण अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेत गेले. त्यानंतर विठ्ठलचा भाऊ पुस्तक ठेवण्यासाठी रूमवर आला. तेव्हा विठ्ठल रूममध्ये बसलेला होता. परंतु, त्यानंतर विठ्ठलने व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून आत्महत्या केली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी विठ्ठलला घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.


आत्महत्या करण्यापूर्वी ठेवलेलं स्टेटस


"मित्रा माझी लाईफ खूप छान चालू होती रे... 
तू जो माझ्यासोबत दगा फटका केलाना, फक्त माझाच नाही तर एक बापाचा आणि एका आईचा आधार घेऊन झाला... मी तर चाललो सोडून कारण तु जे केलस मी एवढं mhot ओझ नाही झेलू शकत मित्रा...
माझ्यासोबत केलं ना तू हे फक्त दुसऱ्याशी नको करू, माझी हत्या ही तुझी pnishment माझा हतेचे कारण तूच, तुझ नाव तर नाही घेत मित्र fkt माझ्यासारख फसू नको कोनला तुला हात जोडून सांगतो मित्रा....
आई बाबा मला माफ करा झाले तर आणि bahu आई बाबाला सांभाळ, अस अर्ध्यावर सोडून चलो मी thumhala आणि हा मी एका व्यक्तीला पण dil pasun.....


विठ्ठलला कोणत्या मित्राने धोका दिला?


छत्रपती संभाजीनगर शहरात एका बँकेच्या व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत मित्राने फसवणूक केल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवल्यावर त्याने मोबाइलमध्ये सीम काढून फेकून दिले असून, हे सीमकार्ड सापडत नाही. त्यामुळे विठ्ठलला कोणत्या मित्राने धोका दिला?, याच पोलिसांकडून तपास केला जात आहे. .


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! आयफोनसाठी वीस वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, संभाजीनगरमधील घटना