PM Modi maharashtra Visit : फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन वेळेला महाराष्ट्रात पर्यायाने विदर्भात (Vidarbha) येण्याची शक्यता आहे. 11 फेब्रुवारीच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ (Yavatmal) मध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील अशी शक्यता व्यक्त केली जात असताना, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीचे तिसऱ्या आठवड्यात नागपूरात(Nagpur News) भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील, अशी माहिती समोर आली आहे.


भाजपच्या एससी सेलच्या (SC Cell) देशभरातील सुमारे 25,000 पदाधिकाऱ्यांचे खास मेळावा / सभा नागपुरात पार पडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यास संबोधित करणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपने पक्षाच्या वेगवेगळ्या आघाडी (Cell) च्या खास सभा वेगवेगळ्या शहरात घेण्याचे ठरवले आहे. त्या अंतर्गत भाजपच्या अनुसूचित जाती आघाडी ही खास सभा नागपुरात होणार आहे.


फेब्रुवारीचे तिसऱ्या आठवड्यात  पंतप्रधान नागपुरात


देशभरात निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली असून जोरदार तयारी सरू करण्यात आली आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष घालत आहे. गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई, सोलापूर, नाशिक नंतर ते आता फेब्रुवारी महिन्यात नागपूर आणि यवतमाळ येथे येणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप कुठलीही तारीख अथवा कार्यक्रमाची घोषणा झाली नसली तरी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूरमध्ये भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्यावतीने राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. यात ते सहभागी होणार आहेत. सोबतच ते यवतमाळचा दौराही करणार असल्याचे समजते आहे. 


संभाव्य पोहरादेवी दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज 


पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारी रोजी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे येऊन दर्शन तसेच नंगारा वास्तूचे लोकार्पण करून सभा घेणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या संभाव्य दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा आणि तालुका प्रशासनाकडून पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी सुरू असून, आढावा घेतला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य पोहरादेवी दौऱ्याच्या अनुषंगाने आठवड्यातून दोन-तीन दिवसात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विविध विभागांचे अधिकारी येथे नियोजनासाठी पोहरादेवी येथे येत आहेत.


त्याशिवाय मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी पंतप्रधानांच्या या संभाव्य दौऱ्याबाबत पोहरादेवी, वसंतनगर, उमरी बुद्रुक, वाईगौळ आणि पंचाळा या पाच ग्रामपंचायतींना 3 जानेवारी रोजी एक पत्र देऊन रस्ते दुरुस्ती, पूल दुरुस्ती, रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे, आवश्यक तेथे फलक लावणे यासंबंधी सूचना केल्या आहेत. आता पंतप्रधानांचा दौरा निश्चित झाल्यास प्रशासनाकडून अधिकृत घोषणा होणार आहे.


गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदा मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर


पंतप्रधान मोदी जानेवारी महिन्यात नाशिक, नवी मुंबई आणि सोलापूर दौऱ्यावर आले होते. मुंबईत अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक इथं आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही हजर राहिले होते. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूरात पंतप्रधानांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचं लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती असल्याने पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या