नागपूरः मित्रांच्या संगतीत कोणी घडतो, तर कोणी बिघडतो. मात्र एका आंतरराज्यीय (Inter state cheater) ठगबाजाने आपल्या मित्राच्या संगतीत राहून त्याचे फसवणुकीचे तंत्र शिकून घेतले आणि आपला स्वतंत्र फसवणुकीचा धंदा सुरु केला. विक्रीसाठी आणलेले ब्रेसलेट (fake gold certificates) सोन्याचे असल्याचे भासवून दोन सोनारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय ठगबाजास इंदूर येथून पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने 17 सप्टेंबर रोजी पाचपावली परिसरातील सुरभी आणि खुशाल ज्वेलर्सच्या मालकांना 3 लाख 10 हजारांनी चुना लावला होता.


अक्षय सोनी (वय 25, रा. ठाणे) असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बंगाल व छत्तीसगडसह अन्य राज्यांतील अनेक जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांची अशाप्रकारे फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमाल चौक परिसरातील इंदोर नमकीनच्या बाजूला मनोज प्रभाकर बोबडे (वय 55) यांचे सुरभी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात 26 वर्षांचा एक युवक 17 सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास आला. त्याने आपल्या हातातील ब्रेसलेट सोन्याचे असल्याचे सांगितले. ते गहाण ठेवून पैसे देण्याची मागणी त्याने केली.


समोरा-समोरच्या दोघांना गंडा


यावेळी मनोज बोबडे यांनी ते घेऊन त्याऐवजी 1 लाख 60 हजार रुपये दिले. दरम्यान, हा युवक समोरच असलेल्या करण कोठारी ज्वेलर्स यांच्याही खुशाल ज्वेलर्समध्ये गेला. तेथेही त्याने दुसरं ब्रेसलेट देऊन सोन्याचं असल्याचे सांगून 1 लाख 50 हजार रुपये मिळविले. त्यानंतर मनोज बोबडे आणि कोठारी यांनी त्या मुलाकडून घेतलेले ब्रेसलेट आणि दिलेले बिल तपासले असता, त्यांना ते दोन्ही बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पाचपावली पोलिसांकडे तक्रार सादर केली. त्यावरुन पोलिसांनी युवकावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी त्याचे लोकेशन (Police Location) मिळवित त्याला इंदूर येथून अटक केली.


मित्राकडून शिकला फसवणुकीचे तंत्र


बारावी उत्तीर्ण असलेल्या अक्षयच्या वडिलांचे इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. तो त्यां (imitation jewellery) ना त्यांच्या व्यवसायात मदत करायचा. सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्याची मुंबईतील साहिल नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने त्याच्याकडून फसवणुकीचे कौशल्य (Fraud Skills) शिकले. त्या कौशल्याचा वापर करीत त्याने अनेक राज्यातील सराफा व्यावसायिकांना फसविले आहे.


जडले फसवणूकीचे व्यसन


चोरी आणि फसवणुकीत हातखंडा मिळविल्यानंतर त्याने ठगबाजीचा नवा मार्ग स्वीकारला. तो बनावट इमिटेशन ब्रेसलेटला शुद्ध सोन्याचा मुलामा लावायचा. विविध राज्यात फिरून सराफा व्यापाऱ्यांची फसवणूक सुरु केली.दरवेळी तो ब्रेसलेटची नेमकी सोन्याची कडी काढून सराफा व्यापाऱ्याला द्यायचा. डोळ्यासमोर कडी काढून देत असल्याने त्याच्यावर विश्वासही बसायचा. यामुळे प्रत्येक वेळी तो फसवणूक करण्यात यशस्वी होत होता. पण अखेर त्याला बेड्या पडल्या आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या


फुटबॉलच्या मैदानात 'जीवघेणा खेळ'! इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान दोन क्लबचे समर्थक भिडले, हिंसाचारात 129 जणांचा बळी


Kanpur Road Accident : कानपूरमधील अपघाताचं भीषण वास्तव; रुग्णालयाबाहेर स्थानिकांचा रोष, पाहा मन हेलावणारे फोटो