मुंबई : अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) 1 मे पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी (Mahadev Betting App Case) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) अटक केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर एसआयटीच्या पथकाने त्याला छत्तीसगडमध्ये अटक केली.. दरम्यान त्याला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महादेव बेटींग ॲपचा प्रसार केल्याप्रकरणी साहिल खानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवाण्यात आली.


अभिनेता साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी


अभिनेता साहिल खानला (Bollywood Actor Sahil Khan) मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला छत्तीसगडमधून मुंबईत आणण्यात आलं. रविवारी साहिल खानला कोर्टात हजर करण्यात आलं. तसेच सुनावणीनंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्तीसगडमधून साहिल खानला शनिवारी ताब्यात घेण्यात आलं होतं, यानंतर त्यानं अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होत. मात्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान या प्रकरणात आता साहिल खानची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.


नेमकं प्रकरण काय?


महादेव बेटिंग या ॲप (Mahadev Betting App) प्रकरणात कारवाई करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवण्यात आले. या बेटिंग ॲपसंबंधित सर्व संकेतस्थळे परदेशातून नियंत्रित केली जात होती. महादेव बेटिंग ॲप या ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अभिनेता साहिल खान याचं नाव बेटिंग ॲप ऑपरेटर म्हणून एफआयआरमध्ये नाव नोंदवण्यात आलं आहे. माटुंगा पोलिसांनील आधीच 31 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. साहिल खानवर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित आणखी एक बेटिंग ॲप चालवल्याचा आरोप आहे. याशिवाय साहिल खानवर फक्त ॲप प्रमोशनच नाही तर ॲप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप आहे.


याआधी साहिल खान दुबईमध्ये ऑनलाइन बेटिंग ॲपच्या एका पार्टीच्या व्हिडिओमध्ये दिसला होता.  त्यावेळी तो व्हिडीओ प्रमोशनल व्हिडीओ असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण एफआयआरमध्ये ॲप ऑपरेटर म्हणून नाव आल्याने साहिल खानच्या अडचणी वाढल्या आहेत. खिलाडी नावाचे बेटिंग ॲप चालवल्याप्रकरणी ही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mumbai Crime News : निवडणुकीदरम्यान मुंबईत सापडलं पैशाचं घबाड, भांडुपमधील पैशाने भरलेल्या गाडीबाबत मोठा खुलासा