नागपूरः जरीपटका परिसरात दिवसाढवळ्या दृष्टिहीन अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय आरोपीकडून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याची माहिती मिळताच नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम मारहण केली. ऐनवेळी पोलिस पोहोचल्यामुळे अक्कू यादव प्रकरणाची पुनरावृत्ती टळली. कुख्यात अक्कू यादव याला संतप्त जमावाने ठार केले होते.
विनोद नारायण नरडवार (वय 55) असे आरोपीचे नाव आहे. विनोदच्या शेजारी पीडित 16 वर्षाची अल्पवयीन दृष्टिहीन मुलगी राहते. दृष्टिहीन असल्यामुळे ती घरीच राहते. पाच वर्षांपूर्वी झाडाखाली दबून तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. कुटुंबात आई आणि मोठा भाऊ आहे. दोघेही मजुरी करून कुटिंबाचा गाडा चालवितात. आरोपी विनोदही मजुरी करतो. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे अल्पवयीन मुलीची आई आणि भाऊ मजुरीसाठी गेले. ती घरी एकटीच होती. याची माहिती असल्यामुळे विनोद दुपारी एक वाजताच्या सुमारास मुलीच्या घरी आला. अल्पवयीन मुलीचे घर गरीब मजुरांच्या वस्तीत आहे. दुपारची वेळ असल्यामुळे झोपडपट्टीतील बहुतांश नागरिक मजुरीसाठी गेले होते. त्याचा फायदा घेऊन आरोपीचे दृष्टिहीन असलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार केले. आवाजावरुन तिला अत्याचार करणारा विनोद असल्याचे समजले. आरडाओरड केल्यानंतर विनोदने धमकी देऊन तिला शांत केले. सायंकाळी आई घरी परतल्यानंतर तिने आपबिती सांगितली.
आरोपी विनोदला जीवे मारण्याची होती तयारी
अल्पवयीन मुलीच्या आईने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वस्तीतील नागरिक संतप्त झाले. त्यांनी विनोदला पकडले. त्याचा बेदम मारहाण केली. ते विनोदला जीवे मारणार होते. देशभरात चर्चेत राहिलेल्या अक्कू यादव प्रकरणात अक्कूला मारणारे नागरिकही जरीपटका परिसरातीलच होते.दरम्यान, पोलिस घटनास्थळी पहोचले. त्यांनी नागरिकांच्या तावडीतून विनोदला सोडविले. त्याला अटक करुन त्याच्यावर अत्याचार तसेच पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला.
वाचाः