भिवंडी: तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. व्यवसायासाठी व्याजावर घेतलेल्या रकमेवर वाढीव व्याज देऊ न शकल्याने चक्क पत्नीकडून शरीर सुखाची (Crime News) मागणी करण्यात आली आहे. परिणामी सततच्या त्रासाला कंटाळून कामील शेख नामक एका व्यक्तीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य करत असताना या घटनेचा मोबाईल कॅमेरात व्हिडिओ तयार करुन ही आत्महत्या करण्यात आली आहे. या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करत घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.


आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ अन् सोशल मीडियावर व्हायरल  


पुढे आलेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या महापोली परिसरात राहणाऱ्या कामिल शेख यांने त्याच परिसरात राहणाऱ्या तीन जणांकडून व्याजाने चार ते पाच लाख रुपये व्यवसायासाठी घेतले होते. तसेच व्याजाचे रक्कम वेळेवर दिले जात होते.  परंतु उरलेल्या मुद्दल रकमेवर देखील तिघांकडून वाढीव व्याज दरासाठी कामील शेख याच्याकडे तगादा केला जात होता. दरम्यान या सततच्या त्रासाला कंटाळून कामिल शेख यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मात्र आत्महत्या पूर्वी त्यांनी मोबाईल कॅमेरात व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.


एकाला अटक, दोघे अद्याप फरार 


यामध्ये त्यांनी संगीतले आहे की,  अमान नसीम भावे, बहुद्दीन उर्फ मुन्ना यासीन अन्सारी, आणि रेहमान कादीर कोतकर  यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी बहुद्दीन उर्फ मुन्ना यासीन अन्सारी यास पोलिसांनी अटक केली आहे. तर अमान नसीम भावे व रेहमान कादीर कोतकर सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. 


'तुला पैसे देता येत नाही तर तुझ्या पत्नीला पाठव'


भिवंडी तालुक्यातील महापोली येथे राहाणारा कामिल  शेख साबणाच्या फॅक्टरीत काम करीत असून त्यांनी स्वतःच्या व्यवसायासाठी त्याच गावात राहाणारे अमान नसीम भावे, बहुद्दीन उर्फ मुन्ना यासीन अन्सारी, व रेहमान कादीर कोतकर यांच्याकडून व्याजाने जवळपास चार ते पाच लाख रुपये घेतले होते. या पैशाला परत देण्यासाठी कामिल शेख वेळेवर व्याज देत होते. काबिल शेख यांनी आतापर्यंत 3 लाख 70 हजार रुपये परत केले होते. परंतु उरलेल्या रकमेवर कामिल शेखकडून वाढीव व्याज दराची मागणी केली जात होती.


ही रक्कम वसूल करण्यासाठी अमान, बहुउद्दिन मुन्ना यासीन अन्सारी आणि रहमानकडून काबिल शेखचा छळ केला जात होता. त्यात दमदाटी आणि शिवीगाळ करुन वेळोवेळी त्रास दिला जात होता. तसेच या तिघांनी पैसे व्याजाचे पैसे वसूल करण्यासाठी कामिल शेखला सांगीतले की तुला पैसे देता येत नाही तर तुझ्या पत्नीला पाठव, असे बोलून कामिलच्या पत्नीसोबत शरीर सुखाची मागणी केली होती. त्यांच्या या त्रासाला कंटाळून अखेर कामिल शेख यांनी विष प्राशन करून आपला आयुष्य संपवलं आहे. मात्र त्यापूर्वी कामीलने मोबाईल कॅमेरा व्हिडिओ तयार करून या आत्महत्या जबाबदार अमान बहुउद्दिन ऊर्फ मुन्ना यासीन अन्सारी व रहमान यांना ठरवले आहे. 


याप्रकरणी गणेश पुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने कलम 108 प्रमाणे आरोपी अमान , बहुउद्दिन ऊर्फ मुन्ना यासीन शेख व रहमान यांच्यावर गुन्हा दाखल करून बहुउद्दिन ऊर्फ मुन्ना यासीन अन्सारी यास अटक करून इतर दोन आरोपी फरारअसून त्यांचा शोध सध्या गणेशपुरी पोलीस घेत आहेत.


हे ही वाचा