Bhandara News भंडारा : अड्याळ वन विभागाच्या हद्दीतील किटाडी ते मांगली शेतशिवारात वाघाचं अस्तित्व आढळून आलंय. दरम्यान, असाच एक वाघ परिसरात आढळून आल्याने त्याला बघण्यासाठी आलेल्या शेकडो नागरिकांनी चक्क वाघावरच दगडफेक केली. त्यामुळं उपस्थित पोलिसांनी नागरिकांना त्यापासून मज्जाव करून त्यांना घटनास्थळावरून पांगविण्याचा प्रयत्न केला. असे होत असताना जमावतील काही नागरिकांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला होता.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकरणावर आता पालांदूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना धक्काबुक्की आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात नितेश वाघाडे (२५) रा. मांगली, अनिकेत बोरकर (३५) रा. मांगली, प्रज्वल बोरकर (२२) रा. मांगली आणि भूषण नागलवाडे (३८) रा. न्याहारवानी अशी संशयित आरोपींमध्ये समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून अड्याळ वनपरिक्षेत्रातील किटाळी परिसरात नागरिकांना पट्टेदार वाघाचं हमखास दर्शन होत आहे. काल (शुक्रवार) सायंकाळी वाघ रस्त्यालगत असल्याच्या माहितीवरून त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी नागरिक प्रचंड हुल्लडबाजी करीत असल्यानं वाघाकडून नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता असल्यानं उपस्थित पोलिसांनी बळाचा वापर करून नागरिकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार रात्री उशिरा घडला. यावेळी वृषभ राऊत हा 14 वर्षीय बालक जखमी झाल्यानं संतप्त नागरिकांनीही पोलिसांना धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. याप्रकरणी जखमी बालकाच्या वडिलांनी पालांदूर पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
किरकोळ कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या
तरुणाच्या हत्येने पुन्हा एकदा नाशिक शहर हादरले आहे. इडली डोसा विक्री करणाऱ्या गाडीला लाथ मारल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने एका हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने आणि डोक्यात दगड खाल्ल्यात प्राण घातक हल्ला करत त्याचा खून केलाय. काल रात्री उशिरा नाशिकच्या सिटी सेंटर मॉल जवळ असलेल्या क्रांतीनगर भागातील संभाजी चौक परिसरात ही घटना घडलीये. खून झालेला तरुण आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आणि घराच्या शेजारील राहणारे होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मयत नितीन शेट्टी हा 40 वर्षीय तरुण संभाजी चौकात खाद्यपदार्थाच्या हॉटेलवर असताना घराशेजारील राहणारे पाच ते सहा संशयित आले आणि सकाळी तू आमच्या रोजी रोटीला लाथ मारली असा वाद घालत शेट्टीवर हल्ला केला. चाकू कोयत्याला हल्ला केल्याने शेट्टी रक्ताच्या चारोळ्यात पडला, संशयतांनी दगड डोक्यात घातल्याने गंभीर जखमी झाला आणि या घटनेत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान संशयतांनी घटनास्थळावरून पलायन केले असून या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत.
हे ही वाचा