Bhandara Accident News भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात आज सकाळी दोन वेगवेगळे अपघात झालेत. एक घटना सातोना-बीड मार्गावर तर, दुसरी करडी मार्गावर घडली आहे. वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील सातोना - बीड मार्गावर झालेल्या अपघातात भरधाव टिप्परनं करण बांते (वय वर्ष १८) या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला चिरडल्यानं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामुळं संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको केलाय. मृतक करण हा आपल्या बहिणीला महाविद्यालयात सोडून दुचाकीनं गावाकडं परत येत असताना ही घटना घडली आहे.
  
तर, दुसरी घटना करडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटल्यानं त्यातील 15 मजूर गंभीर जखमी झालेत. या अपघातातील जखमींना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. 


अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बंगाली तरुणाला अटक


खामगाव शहरातील जुनाशहर परिसरात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बंगाली तरुणाला रात्री पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. कौशिक टीकादार अस या तरुणाचं नाव असून गेल्या अनेक महिन्यांपासून कुठलीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना हा तरुण रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. यावरून रात्री उशिरा कारवाई करत या तरुणाला अटक करत पोलिसांनी अवैधरित्या थाटलेल्या क्लिनिकच सर्व साहित्य जप्त केल आहे. याबाबत मात्र जिल्हा आरोग्य प्रशासन अनभिज्ञ असून जिल्ह्यात अद्यापही ५०० च्या वर अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे दवाखाने थाटून आहेत . मात्र गेल्या दहा वर्षापासून कुठल्याही अवैध वैद्यकीय व्यावसायिकावर आरोग्य विभागाने कारवाई केलेली नाही.


अंगावर भिंत कोसळून सहा कामगार जखमी 


रायगडच्या खोपोली मधील उंबरे गावाजवळ एका खाजगी कंपनीच्या भिंतीच काम सुरू असताना अंगावर मातीचा ढिगारा कोसळून या परीसरात काम करणारे एकून 6 कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला आणि हे कामगार या ढिगाऱ्याखाली अडकले मात्र जेसीबीच्या साहाय्याने या सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. काल सायंकाळी ही घटना घडली सर्व जखमींना खालापूर मधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये धर्मदेव,राकेश राजभार, मंजित चौहान, जितेंद्र, राम समुज, प्रेम सागर. अशी नावे आहेत सर्व राहणार उत्तर प्रदेश.


हे ही वाचा