Bhandara Doctor News : भंडाऱ्यात एक डॉक्टर कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातली ही घटना आहे. डॉक्टर कडस्कार असं मारहाण करणाऱ्या डॉक्टरांचं नाव असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान या घटनेनंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच या डॉक्टरविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कडस्कार यांनी आपल्याच कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा मारहाणीचा व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Video Viral) झाला असून पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


डॉक्टर सागर कडस्कर यांनी रुग्णलयातील शिपाई पदावर असेलल्या नारायण उइके यांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. ही घटना 22 मार्चची आहे. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


डॉक्टर सागर कडस्कर यांच्या म्हणण्यानुसार शिपाई नारायण उइके हा रुग्णालयात रोज दारू पिऊन येत असल्यामुळे आपण त्यांना मारहाण केली.  मात्र डॉक्टरांनी आपल्या कर्मचाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याऐवजी कायदा हातात घेत कर्मचाऱ्यांला मारहाण केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.  


उइके यांना मारहाण झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आदिवासी संघटना डॉक्टर विरोधात एकवटल्या आहे. तसेच डॉक्टर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या