भंडारा : घरात झोपलेल्या 15 वर्षीय मुलीवर सावत्र बापानेचं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात  घडली. विशेष म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात ही घटना घडली असून आज समोर आल्याने गावातही खळबळ उडाली आहे याप्रकणी, आरोपी बापाविरुद्ध मुलीने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) अधिक तपास सुरू आहे. 

राज्यात गेल्या काही महिन्यांत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे लैंगिक अत्याचार किंवा बलात्काराच्या घटनांमध्ये बहुतांश आरोपी हे जवळचे किंवा ओळखीचेच असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. आता, भंडारा जिल्ह्यातील एका गावा घडलेली घटनाही अशीच संतापजनक आहे. सावत्र बापानेच 15 वर्षीय मुलीवर झोपेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध कलम 64 (2)(एफ), 65 (1) भारतीय न्याय संहिता सह कलम 4, 6 पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली. न्यायालयानं आरोपी बापाला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तिर्री गावात ही घटना घडली असून मनोज नामदेव रंगारी (45) असे आरोपीचे नाव आहे.  

हेही वाचा

अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2024 चं राज'कारण'