भंडारा : इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय स्वतःच्याच मुलीला आई वडिलांनी पैशासाठी विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडल्याचा गंभीर प्रकार भंडाऱ्यात घडला आहे. पीडितेच्या काकीनं  आरोपाची तक्रार पोलिसात केल्यानंतर हा घृणास्पद आणि खळबळजनक प्रकार समोर आला. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या काकीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिल आणि अन्य एका महिलेसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. तर, एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडिता ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. या प्रकारांमुळे भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


संजय (50) (वडील), मीनाक्षी (40) (आई), बादल महेन्द्र सुखदेवे (32) रा. सराटी ता. साकोली, विनोद रामदास चरडे (45) रा. आठवा मैल बौध विहारचे बाजुला नागपुर ह.मु. व्दारका नगर तिलकसिंग वार्ड गोंदिया जि. गोंदिया, पप्पु भगवान फुल्लुके (42) रा. तलाव वार्ड साकोली, वैशाली मनसाराम लंजे (30) रा. तलाव वार्ड, साकोली असे अटक करण्यात आलेल्या सहा जणांचे नाव आहे. तर, अविनाश बांते या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. पीडिता ही साकोली येथील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. गावावरून रोज येण्याजण्यासाठी त्रास होत असल्याने ती साकोली येथील काकाकडे राहून शिक्षण घेत होती. मात्र, कालांतराने पीडितेच्या वडिलांनी तिला गावाला नेले. बऱ्याच दिवसापासून पीडीतेसोबत बोलणे झाले नसल्याने काकाने 14 डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबीयांची चौकशी केली.  यावेळी पीडीतेने घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. याप्रकरणी काकू ने पुढाकार घेत पीडीतेला साकोली पोलीस ठाण्यात आली याची तक्रार नोंदवली. 


पैशासाठी पोटच्या मुलीला आई आणि वडिलांनीच ओळखीतल्या काही इसमांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केली. हा प्रकार वाढत गेलेले महिन्याभरामध्ये तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरीत्या अत्याचार करण्यात आले. कधी पिढीच्या गावातील घरीच आई-वडिलांना समक्ष तर कधी साकोली तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पीडीतेवर मारहाण करीत अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी पिढीतेच्या आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली असून यातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.



त्या माध्यमातून त्यांनी पैसे कमवण्याचा प्रकार केला आहे. स्वतःच्या मुलीला बळजबरीने विकून शारीरिक अत्याचार घडवून आणण्याचा हा गंभीर प्रकरण समोर आल्याने त्याची चौकशी केली असता त्यात सात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील आई-वडिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली असून सातवा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे, अशी महिती भंडारा दिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितलं.
जिल्हा पोलिस अधीक्षक, भंडारा