बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुंड गोट्या गित्ते याच्यासह सात जणांवर पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली. तडोळी येथील एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
परळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुण येथील शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर 18 ऑक्टोबर 2023 साली हल्ला झाला होता. लोखंडी रॉड फरशी आणि काठीने मारनकर यांना गंभीर जखमी केले होते. तसेच सातभाई यांच्या जवळील दोन लाख 70 हजार रुपये रक्कम देखील जबरदस्तीने काढून घेण्यात आली होती.
Walmik Karad Gang News : वाल्मिक कराडशी संबंधित गुंड
या प्रकरणात रघुनाथ फड,जगन्नाथ फड, सुदीप सोनवणे,बालाजी दहिफळे, विलास गित्ते या पाच जणांना अटक झाली होती. सुदीप सोनवणे वगळता इतरांना जामीन मिळाला आहे. तर धनराज फड आणि ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते हे फरार आहेत.
आता याच प्रकरणात बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला टोळीप्रमुख रघुनाथ रामराव फड, जगन्नाथ विक्रम फड, सुदीप रावसाहेब सोनवणे, बालाजी अंकुश दहिफळे, विलास बालाजी गित्ते आणि ज्ञानोबा उर्फ गोट्या गित्ते याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, कट रचणे, अवैध शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
छत्रपती संभाजी नगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पाठवलेल्या प्रस्तावानंतर आता या सर्व विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसातील परळीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना पोलिस अधीक्षकांनी दणका दिल्याचे बोलले जात आहे.
MCOCO Act Against Parli Gang : मकोका अंतर्गत कारवाई झालेले गुंड
1) रघुनाथ फड
2) जगन्नाथ फड
3) सुदीप सोनावणे
4) बाळाजी दहिफळे
5) विलास गित्ते
6) धनराज उर्फ राजेभाऊ फड
7) ज्ञानदेव उर्फ गोट्या गित्ते
या टोळीतील सर्वजण हे वाल्मीक कराडचे समर्थक होते. गोट्या गित्ते हा तर वाल्मिक कराडला पुण्यातून बीडला आणताना त्याच्या ताफ्यात होता. तर सुदीप सोनवणे हा बीड कारागृहात कराड आणि गित्ते गँग यांच्या झालेल्या वादाचे कारण होता.
MCOCO Act Against Beed Gang : बीड जिल्ह्यात एकूण चार गँगवर मकोकाची कारवाई
- 11 जानेवारी रोजी कराड व घुले गँगवर मकोकाची कारवाई.
- 27 जानेवारी रोजी बीडच्या आठवले गँगवर मकोकाची कारवाई.
- 20 मार्च रोजी आष्टीतील भोसल गँगवर मकोकाची कारवाई.
- 10 मे रोजी परळीच्या फळग्यांवर मकोकाची कारवाई.