Beed News Update : बीडमधील परळी येथे दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश संजश्री. जे घरत यांनी आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा सनावली आहे. परंतु या प्रकरणातील पीडित मुलीचा गेल्या काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूनंतर पीडितेला न्याय मिळाल्याची भावना परिसरातून व्यक्त केली जात आहे. आत्याचारानंतर पीडित मुलीने परळी पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये याप्रकरणी खटला सुरू होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरामध्ये आई-वडील शेतात गेल्यामुळे पीडित मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी पवन उकंडे याने तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेनंतर पीडित मुलीने परळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा खटला अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुरू होता. या प्रकरणी न्यायालयाकडून सरकार पक्षाचा साक्षीपुरावा आणि सरकारी वकील अॅड. रामेश्वर ढेले यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर पवन उकंडे या आरोपीला न्यायालयाने 25 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि तीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी ही दिव्यांग होती. या प्रकरणात साक्षीपुरावे तपासले जात असताना तिची साक्ष झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिला या निकालाने मरणोत्तर न्याय मिळाला अशी भावना जनमानसातून व्यक्त होत आहे. या प्रकरणामध्ये अॅड. विलास लोखंडे यांनी अथक परिश्रम करून फिर्यादी आणि तिच्या कुटुंबाला मदत केल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे.
15 दिवसांत पीडितेचा मृत्यू
दरम्यान, शेतात गेलेले आई-वडील घरी परतल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर या पीडितेने परळी पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात अत्याचाराची तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर हा खटला न्यायालयात सुरू झाला. न्यायालयात पीडितेची साक्ष देखील घेण्यात आली. परंतु, दुर्देवाची बाब म्हणजे संशयिताविरोधात साक्ष दिल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच पीडितेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने परिसरात शोक व्यक्त करण्यात आला. अनेक घडामोडीनंतर अखेर आज संशयीत आरोपीला 25 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
महत्वाच्या बातम्या