Beed crime: बीडमध्ये कोयता आणि सत्तुरने एका तरुणाला धमकावून व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल का केला? याचा जाब मारहाण झालेल्या तरुणाने विचारला. आणि हाच राग मनात धरून तरुणाच्या हाताचे बोटे छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला. याप्रकरणी चार जणांवर पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.. या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बीडमधील गुन्हेगारी थांबणार कधी? हा सवाल कायम आहे. 

Continues below advertisement


नेमकं प्रकरण काय?


तीन दिवसांपूर्वी शेख अलीम अनिस या तरुणाला चार जणांच्या टोळक्याने कोयता आणि सत्तुरने धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. घटनेतील मुख्य आरोपी मारहाण झालेल्या तरुणाचा मित्रच आहे. हा व्हिडिओ इतर मित्रांना का दाखवतो? याचा जाब अनिसने विचारला त्याच्या मित्राने गाडीवर बसवून अज्ञात स्थळी नेत मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचे बोट छाटण्यात आले..पीडित तरुणानं दिलेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी डोंगरावर नेत चार जणांनी बेदम मारले . त्यांच्या हातात खंजीर होता .खंजरानं मला मारायचे . मी एकदा व्हिडीओ केला आणि का मारलं म्हणून जाब विचारायला त्यांच्या घरी गेलो . त्यावेळी मासूम कॉलनीच्या आदिलने बाहेर नेत हात पकडला . शेहबाज नावाच्या दुसऱ्या तरुणानं माझ्या हाताची बोटं तोडली . मी तिथेच पडलो .आजूबाजूच्या लोकांनी मला कृष्ण हॉस्पिटलमध्ये नेलं . हाताची चार बोटं कातडीवर लटकली आहेत . दोन बोटांमध्ये रॉड टाकला आहे . टाके मारले आहेत . मारहाण करताना तिथे चार लोक होते . व्हिडीओ काढणारा एक जण होता असे पीडित तरुणाने सांगितले .


दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस येत आहेत. खून, दरोडा, विनयभंगासारख्या घटना ताज्या असताना आता मित्रानेच मित्राचे बोटे छाटल्याने बीड मध्ये मात्र पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे..


व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?


व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण एका युवकाला धमकावत असल्याचे दिसत आहे. दोघांच्या हातात धारदार कोयते आणि सत्तुर असून, ते त्या युवकाला शिवीगाळ करत धमकावत आहेत. "आता तुझ्यावर वार करतो" असे म्हणत ते त्याच्यावर धावून जातात. काही क्षणांतच त्यांनी शेख अलीम अनिस या तरुणावर हल्ला केला. हल्ल्यात असीमच्या हातावर गंभीर इजा झालीय. जखमी असीम याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी त्याला एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. असीमवर धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याला टाके घालावे लागले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.