Beed :  भाजी भाकरी का बनून देत नाही म्हणून नातवाने आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील (Majalgaon) नांदलगावमध्ये घडली आहे. आजीची हत्या करणाऱ्या नातवाला दिंद्रुड पोलिसांनी अटक केली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) घरामध्ये साबुदाण्याचा फराळ बनवण्यात आला होता. मात्र, नातवाने भाजी भाकरीचा हट्ट धरला आणि रागाच्या भरात आपल्या आजीचा खून केला


माजलगाव तालुक्यातल्या नांदलगाव या ठिकाणी कौशल्याबाई राऊत या आपल्या पतीसह आणि नातवासह राहत होत्या एकादशीच्या दिवशी त्यांनी घरात सर्वांसाठी साबुदाण्याचा फराळ केला होता. याच दरम्यान त्यांचा 29 वर्षाचा नातू राहुल बाळासाहेब राऊत हा जेवणासाठी घरी आला. यावेळी त्याने जेवणासाठी फराळ नको भाजी भाकरी का केली नाही असा जाब आजी कौशल्याबाई यांना विचारला. मला जेवणासाठी तात्काळ भाजी भाकरी बनवून देण्याचा हट्ट धरला. यावरूनच दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादातून नातू राहुल याने आजी कौशल्या बाईच्या डोक्यात काठीने जबर मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आणि जागेवरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला..


या प्रकरणा नंतर दिंद्रुड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. आधीचा खून करणाऱ्या राहुल राऊत याला अटक केली आहे.. एकादशीच्या दिवशी अगदी शुल्क कारणावरून कौशल्याबाई यांचा खून झाल्याने नांदल गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


सावत्र बापाकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; विवस्त्र नाचवत बनवला व्हिडीओ


 छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या प्रियकराने तीच्या 14  वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापजनक म्हणजे, या नराधमाने मुलीला विवस्त्र करत तीचा मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रीकरणही केले होते. दरम्यान, सततच्या अत्याचाराला कंटाळून या मुलीने थेट पोलिसांत धाव घेतली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. शहरातील पुंडलिकनगर परिसरात ही धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली.


अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी दोन वर्षांची असतांना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यांनतर तीचा अशपाक गफ्फार शेख सोबत दुसरा विवाह झाला. मात्र, अशपाकची नियत खराब झाली आणि त्याने काही दिवसांपासून मुलीवर अत्याचार सुरू केले. तिला सातत्याने दुधात औषध देऊन तो अत्याचार करत राहिला. तसेच, तीला विवस्त्र करत तीचा मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केले. या सर्व अत्याचाराने पीडित मुलगी घाबरून गेली होती. त्यामुळे, अखेर मुलीने पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.