Beed Crime : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हायव्होल्टेज विद्युत तार चोरी करण्याच्या प्रयत्नात अख्खा टॉवरच कोसळल्याने दोन चोरट्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, घटनेनंतर इतर साथीदारांनी अपघाताचा बनाव रचून मृतदेह परभणीला नेले, मात्र तिथे गेल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

Continues below advertisement

Beed Crime : नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून पाच जणांची एक टोळी केज तालुक्यातील नांदूर घाट शिवारात तारा चोरण्याच्या उद्देशाने आली होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास हे चोरटे हायव्होल्टेज टॉवरवर चढले आणि तारा कापण्याचे काम सुरू केले. मात्र, याच दरम्यान टॉवर जमिनीवर कोसळला. या भीषण दुर्घटनेत अविनाश पाटोळे आणि आकाश आडे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Beed Crime : अपघाताचा बनाव फसला

घटनेनंतर घाबरलेल्या इतर तीन साथीदारांनी (आकाश पेठे, दीपक भगत आणि वैभव आदत) पोलिसांपासून वाचण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यांनी या मृत्यूला 'रस्ते अपघाताचे' स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मृतदेह एका कारमध्ये टाकून त्यांनी थेट परभणी गाठले. परभणीत पोहोचल्यानंतर मृतदेह गाडीतच सोडून तिघेही साथीदार तिथून पसार झाले.

Continues below advertisement

गाडीच्या चालकाने जेव्हा रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मृतांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळाली. नातेवाईकांनी चौकशी केली असता आणि पोलिसांनी तपास चक्रावून फिरवल्यानंतर चोरीचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Beed Crime : पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच परभणी आणि केज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. टॉवर नेमका कसा कोसळला आणि या टोळीचे आणखी कुठे जाळे पसरलेले आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असून, या घटनेने बीड आणि परभणी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Kharat Nashik Crime News: कोर्टात आणताच न्यायमूर्तींनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा अशोक खरातचं एका शब्दात उत्तर; म्हणाला...

Ashok Kharat Nashik Court Hearing: अशोक खरात पोलिसांना धड उत्तरं देईना, महिलांचा उल्लेख करताच उडवाउडवीची उत्तरं, सरकारी वकिलांनी कोर्टात काय-काय सांगितलं?