Sonam Kapoor Welcome Baby Boy: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री सोनम कपूर (Actress Sonam Kapoor) दुसऱ्यांदा आई झाली आहे. 29 मार्च 2026 रोजी नव्वदच्या दशकातले सुपरस्टार अनिल कपूर (Actor Anil Kapoor) यांची लेक अभिनेत्री सोनम कपूरनं आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. एका चिमुकल्या बाळाचे सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा (Anand Ahuja) पालक बनले. सोनम कपूरनं स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली. सोनमनं शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.  

सोनम कपूरकडून गूड न्यूज (Sonam Kapoor Welcome Second Baby)

सोनम कपूरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोनमनं गूड न्यूज शेअर करताना एक फोटो शेअर केलाय. त्यावर एक गोड मेसेजही लिहिलाय. सोनमनं लिहिलंय की, "कृतज्ञता आणि प्रेमानं भरलेल्या अंतःकरणानं, आम्ही अत्यंत आनंदानं जाहीर करतोय की, आज 29 मार्च 2026 रोजी आमच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय..." पुढे सोनमनं लिहिलंय की, "आमचं कुटुंब आता आणखी मोठं झालंय... वायू आपल्या धाकट्या भावाचं स्वागत करण्यास खूपच उत्सुक आणि आनंदी आहे. या नव्या आगमनामुळे आम्ही स्वतःला अत्यंत भाग्यवान समजत आहोत, या चिमुकल्यानं आमचं घर आनंद आणि आशीर्वादानं भरून टाकलंय. आयुष्याच्या या नव्या पर्वाची सुरुवात करत असताना, आम्ही ईश्वराचे ऋणी आहोत. सप्रेम, सोनम, आनंद आणि वायू..."

अभिनेत्री सोनम कपूरनं 2018 मध्ये बिझनेसमन आनंद अहुजासोबत आपली लग्नगाठ बांधलेली. बॉलिवूडच्या पॉवरफुल कपल्सपैकी सर्वात स्टालिश कपल म्हणून दोघेही ओळखले जातात. लग्नानंतर सोनमनं मोठ्या पडद्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि पर्सनल लाईफवर तिनं जास्त लक्ष देण्याचं ठरवलं. 2022 मध्ये तिनं आपल्या मोठ्या मुलाला जन्म दिलेला. ज्याचं नाव वायू कपूर आहुजा आहे. 

दरम्यान, आपल्या लाडक्या अभिनेत्रीनं दुसऱ्यांदा गूड न्यूज दिल्याचं ऐकून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झालाय. असं मानलं जातंय की, अगदी आधीप्रमाणेच, कुटुंबानं हा विशेष क्षण अत्यंत खाजगी पद्धतीनं साजरा केलाय. सोनम आपल्या मुलगा 'वायू'सोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यावरही चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sanjay Dutt Net Worth: 295 कोटींचं नेटवर्थ, 50 कोटींचा बंगला, राजासारखं आयुष्य जगतोय 66 वर्षांचा स्टारकीड; लक्झरी घराचे PHOTO पाहून फिरतील डोळे