Horoscope Today 30 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 30 मार्च 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस घरामध्ये सौख्याचा ठेवा सापडल्याचे लक्षात येईल, त्यामुळे घरी जास्त रमाल थोडा आरसात चैनीत दिवस घालवाल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस व्यवसायात कामाकडे जरा दुर्लक्ष होईल, त्यामुळे लाभही कमी मिळेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस कामानिमित्ताने परदेश प्रवासाच्या संधी उपलब्ध होतील, एखादी आर्थिक गुंतवणूक चांगली होऊ शकेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस तुम्ही केलेल्या महत्त्वाच्या कामाची नोंद वरिष्ठांनी घ्यावी, त्यासाठी ज्यादा कष्टाची संपर्काची तयारी ठेवावी लागेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस महिलांना जरा जास्त कष्ट पडतील, काही बाबतीत दृढनिश्चयी राहाल, आपली मते किती प्रयत्न केला तरी बदलणार नाही 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस ज्या गोष्टी गुप्त ठेवायला हव्यात, त्या काही कारणामुळे तुम्हाला दुसऱ्यांना सांगाव्या लागतील, जोडीदाराशी थोडक्या कारणावरून खटकेल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस तुमच्यातील कलेसाठी समाजासमोर येणे आवश्यक आहे, तेथे थोडे कमी  पडाल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस आज थोडा अस्वस्थपणा जाणवेल चुका होतील, पण त्या दुरुस्तही करता येतात हे लक्षात ठेवलेत तर बरेच काही मिळवून जाल. 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आज महिलांनी कामाची योग्य आखणी करावी, दुसऱ्यांवर चटकन विसरून राहण्याचा गैरफायदा लोक घेतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस सरकारी नोकरीत असणाऱ्यांना प्रमोशनच्या संधी येऊ शकतात, कमीत कमी त्याची बीजे तरी पेरली जातील 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस थोडे अस्थिर आणि चंचल बनाल, प्रकृतीची काळजी घ्यायला हवी, श्वासाचा त्रास असणाऱ्यांनी वेळेवर औषधोपचार घ्यावेत 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस आर्थिक स्थिती सुधारण्याच्या मार्गावर राहील, नोकरीच्या ठिकाणी चांगले वातावरण लाभल्यामुळे काम करायला आनंद वाटेल.

हेही वाचा

2026 Horoscope: मार्च संपतोय, 2026 चे पुढचे 9 महिने चांगले की वाईट? 6 राशींना मोठ्ठे सरप्राईझ.. खुशखबर अन् पैसा! 12 राशींचे राशीभविष्य..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)