Badlapur Crime News: बदलापूरात मैत्रीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. येथे एका 25 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अखेर या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. हत्या झालेल्या युवकाच्या मित्रानेच क्षुल्लक कारणावरून दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 25 एप्रिल रोजी बदलापूरच्या खरवई तळपाडा या भागात एका मोकळ्या जागेत पंचवीस वर्ष युवकाची दगडाने डोकं ठेचून हत्या करण्यात आली होती. हत्येची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत आरोपीचा शोध सुरू केला. हत्या झालेल्या युवकाचे नाव प्रसाद झुंजूर्के होते. मात्र त्याची हत्या कोणी केली याचा शोध लागत नव्हता. अखेर बदलापूर पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे 25 एप्रिल रोजी प्रसादला त्याचा मित्र समसूल करीम सोबत या परिसरात दारू पीत असताना काहींनी पाहिले होते. शिवाय तो हत्या झाल्यापासून समसुल गायब असल्याचे ही पोलिसांना समजले. त्यामूळे पोलिसांचा समसुल वर संशय बळावला. मग पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे तो आंध्र प्रदेश ला गेल्याचे समजलं. 


पोलीस आंध्र प्रदेश ला गेल्यावर तो पुन्हा कल्याण ला येत असल्याचे समजले. कल्याण स्टेशन परिसरात बदलापूर पोलिसांनी सापळा रचून समसुलला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी समसुल करीम ला प्रसादच्या हत्ये प्रकरणी अटक केली.


महत्वाच्या बातम्या


कुंपणानेच शेत खाल्ले! सुरक्षा रक्षकाने पळवली कॅश व्हॅनमधील पाच लाखांची रोकड, कल्याणमधील घटनेने खळबळ  


जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या पीएवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक  


धक्कादायक! एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली 82 लाख रूपयांची रक्कम घेऊन चालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू


चोरट्यांनी चक्क जेसीबीने फोडले एटीएम, सांगली जिल्ह्यातील मिरजमधील घटना