हैदराबाद : गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांकडे असते, अनेकदा आर्थिक गुन्हे प्रकरणातही लाललुचपत अधिकारी सापळा असून लाच घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करतात. मात्र, काहीवेळा ज्यांच्यावर मोठी जबाबदारी असते तेच पोलीस अधिकारी लाच घेताना आढळून येतात. अगदी वाहतूक पोलिसांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकारीही लाचेच्या मोहातून सुटत नाहीत. हैदराबादमधील (Hyderabad) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (ACB) आज सकाळी अशाच्या एका पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. हैदराबादमधील सहायक पोलीस आयुक्त टी.एस. उमा माहेश्वरा राव यांच्या घरावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. विशेष म्हणजे एसीबीने शहरातील उमा माहेश्वरी राव यांच्याशी संबंधित 10 ठिकाणी छापेमारी केली आहे. 


अवैध मार्गाने पैसा गोळा करुन जमा केल्याच्या आरोपाखाली एसीबीने ही कारवाई केली आहे. राव यांची संपत्ती त्यांच्या उत्पन्नापेक्षा कैक पटीने अधिक असल्याचमुळे पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी छापेमारी केली. राव यांच्यासह त्यांचे मित्र आणि नातेवाईकांकडेही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. एसीबीचे संचालक ए.आर.श्रीनिवास यांनी याबाबत सांगितले की, साहिती इन्फ्रा जमीन घोटाळा प्रकरणात ही कारवाई होत असून त्याबाबत नंतर तपास केला जाईल, असे श्रीनिवास यांनी स्पष्ट केले. एसीबीच्या या धाडीत 45 लाख रुपयांची रोकड आणि 65 तोळे सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे. दरम्यान, सहायक आयुक्त राव यांच्यावर झालेल्या एसीबी कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिस विभागातही हा विषय चर्चेत आहे.  


हेही वाचा


पुण्यातील मोक्का टोळीच्या मुसक्या आवळल्या, गावठी कट्टा, कत्तीसह धाराशिवमध्ये तिघांना अटक