पुणे : पुण्यात विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे गाडीने दोघांचा (Pune Accident News) जीव घेतला आणि त्यानंतर या श्रीमंत असलेल्या वडिलांतच्या सतरा वर्षाच्या मुलावर आणि वडिलांच्या या प्रतापावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यात मी दारु पितो हे पप्पांना माहिती आहे.मी ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग घेतलं नाही. माझ्याकडे लायसन्स नाही तरीही मला पप्पांनी गाडी चालवायला दिली, असं विशाल अग्रवनालच्या मुलांने पोलिसांसमोर धडाधड सांगितलं आणि स्वत:च्याच वडिलांना गोत्यात आणलं. रविवारी पहाटे भरधाव पोर्शेने दोघांना धडक दिली. त्यानंतर या मुलाला 15 तासातच जामीन मंजूर केला. हा मुलगा मद्यप्राशन करुन होता की नाही?, यासाठी मेडिकल तपासणी करण्यात आली होती. मात्र या तपासणीचे रिपोर्ट येणापूर्वीच मुलाला जामीन मंजूर केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आणि पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं.
अग्रवालच्या मुलाने पोलिसांसमोर सगळंच धडाधड सांगून टाकलं, तो म्हणाला की मी दारु पितो हे पप्पांना माहित होतं. ते म्हणाले की मित्रांसोबत पार्टीला जातोय ना मग ती ग्रे पोर्शे घेऊन जा.मी ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग घेतलं नाही. माझ्याकडे लायसन्स नाही तरीही मला पप्पांनी गाडी चालवायला दिली. वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत graduation party करण्यासाठी गेला होता. पार्टला जाताना वडिलांची आलीशान पॉर्शे कार घेऊन तो गेला. पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत वेदांतने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टॉवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली. त्यांनंतर एका स्वीफ्ट कारला धडक दिली. कोट्यवधी रुपये किमतीच्या कारनं आणि कारचालकाच्या बेदरकारपणानं दोघांचा जीव घेतला.
अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा असे दोघेही आयटी अभियंते होते. हे दोघे आपल्या मित्रांसोबत पार्टी करुन घरी चालले होते. पण वेदांत अग्रवालच्या भरधाव वेगानं त्यांना अक्षरश: चिरडलं . धक्कादायक म्हणजे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी आरोपीच्या कारला ना पुढे नंबर प्लेट होती ना मागे.. वेदांत अग्रवाल चालवत असलेल्या आणि नंबरप्लेट नसलेल्या या कारची किंमत तब्बल अडीच कोटी आहे. अपघातग्रस्त इलेक्ट्रिक पोर्शे स्पोर्ट्स कारची किंमत तब्बल अडीच कोटी आहे . 260 किलोमीटर प्रतितास इतका तिचा वेग आहे. फक्त 2.6 सेकंदात ही कार 100 किलोमीटरचा वेग पकडते.
इतर महत्वाची बातमी-