पुणे: नाशिकच्या अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ 'कॅप्टन' खरातच्या अश्लील कृत्यांच्या मागे दडलेले आर्थिक व्यवहारांचे मोठे जाळे आता हळूहळू उलगडू लागले आहे. खरातचे सर्व आर्थिक व्यवहार आणि जमिनींच्या खरेदी-विक्रीचे गणित सांभाळणाऱ्या एका चार्टर्ड अकाउंटंटचे (CA) कार्यालय पुण्यात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.(Ashok Kharat)
स्वारगेट परिसरातून हलत होती सूत्रे
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील स्वारगेट परिसरात या चार्टर्ड अकाउंटंटचे कार्यालय आहे. संबंधित सीए गेल्या पाच वर्षांपासून अशोक खरातसोबत अत्यंत जवळून काम करत होता. खरातने स्थापन केलेल्या 'ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट'वरही या सीएने पाच वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे. सध्या तो या ट्रस्टवर नसला, तरी खरातच्या साम्राज्यातील प्रत्येक पैशाचा हिशोब या सीएच्या माध्यमातूनच पूर्ण व्हायचा.(Ashok Kharat)
पाच वर्षांच्या व्यवहारांची 'कुंडली' सीएकडे?
अशोक खरातने केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, तर रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या पाच वर्षांत खरातने कुठे-कुठे जमिनींचे व्यवहार केले? त्या व्यवहारांसाठी पैसा कोणाकडून आला? आणि गुंतवणुकीच्या नावाखाली किती लोकांची आर्थिक फसवणूक केली? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुणेकर सीएकडे असण्याची दाट शक्यता आहे. खरातच्या नावावर असलेल्या आणि बेनामी मालमत्तेची सर्व माहिती या सीएकडे दडलेली असल्याचे बोलले जात आहे.
एसआयटी (SIT) चौकशी करणार का?
खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (SIT) आणि नाशिक पोलीस आता या चार्टर्ड अकाउंटंटची चौकशी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरातच्या अश्लील व्हिडिओंच्या आधारे जे आर्थिक ब्लॅकमेलिंग झाल्याचे आरोप होत आहेत, त्या पैशांचा विनियोग कसा झाला, याचा छडा लावण्यासाठी या सीएची उलटतपासणी होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
अशोक खरात दहावी परीक्षेत गणितात नापास
अशोक खरातच्या शैक्षणिक वास्तव समोर आलं आहे. दहावी परीक्षेत गणितात नापास झाल्याची माहिती समोर आले आहे. गुणपत्रिकेनुसार एकूण २५१ गुण, टक्केवारी सुमारे ३५.८८% तर मराठीमध्ये 39 इंग्रजीत 37 गणितात 28 विज्ञानात 62 समाजशास्त्राचा 38 आणि हिंदीमध्ये 47 गुण मिळाले होते. नाव बदलून ‘अशोककुमार’ तर कॅप्टन उपाधी लावून जहाजावर अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. खरातचे खरे नाव लक्ष्मण असल्याचं समोर आलं आहे.सिन्नर तालुक्यातील कहांडळावडीमध्ये खरात वावी येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे. अंकशास्त्र शिकवणारा व्यक्ती स्वतःच गणितात अपयशी झाल्याचे दिसून आले आहे.(Ashok Kharat)
शाळेत 'लक्ष्मण' असलेले मूळ नाव नंतर झालं 'अशोककुमार'
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) आहे. तो शिक्षणासाठी तेथून चार किलोमीटरवर असलेल्या वावी येथील माध्यमिक शाळेत जात होता. १ जून १९६५ ची जन्मतारीख असलेल्या अशोक खरात याचे शाळेत नाव 'लक्ष्मण एकनाथ खरात' असे होते. या लक्ष्मण नावाने त्याने मार्च १९८३ मध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा बैठक क्र. सी-५२३४१ या आसन क्रमांकाने दिली. त्यात खरात दोन विषयांत नापास झाल्याचे दिसून येते. खरात याला मराठी विषयात ३९, इंग्रजी ३७, गणित २८, विज्ञान ६२, समाजशास्त्र ३८, हिंदी ४७, असे एकूण २५१ गुण मिळाले होते. तर टक्केवारी जेमतेम ३५.८६ होती.(Ashok Kharat)
