Sachin Goswami Post On Ashok Kharat Case:नाशिकच्या (Nashik News) अशोक खरात प्रकरणानं (Ashok Kharat Case) फक्त देशभरातच नाहीतर संपूर्ण जगभरात खळबळ माजवली आहे. अशोक खरात यानं अनेक महिलांचा लैंगिक छळ (Sexual Harassment of Women) केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. आतापर्यंत भोंदूबाबा, विकृत अशोक खरावर (Ashok Kharat) सात गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांसोबतच एका विद्यार्थिनीचाही या नराधमानं छळ केल्याचं समोर आलं आहे. राजकीय, सामाजिक बड्या हस्तींच्या संपर्कात असलेल्या अशोक खरातनं अनेकांची आर्थिक फसवणूकही केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाची एसआयटीकडून सुरू असून अनेक नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. अशातच या प्रकरणी अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता एका दिग्दर्शकानं अशोक खरात प्रकरणी फक्त सहा शब्दांची मार्मिक पोस्ट केली आहे.
महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) या भोंदूबाबाचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. पोलिसांकडे तक्रार करणारी महिला एकमेव नाही तर अशा अनेक महिलांचं त्यानं शोषण केल्याचं समोर येतंय. अशोक खरातच्या अत्याचाराचे 58 व्हिडीओ आतापर्यंत पोलिसांना सापडले आहेत. विकृत भोंदुबाबा अशोक खरातचे प्रताप समोर आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात (Maharashtra News) खळबळ माजली आहे.
सचिन गोस्वामी यांची फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट (Sachin Goswami Post On Ashok Kharat)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवरुन यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. अशोक खरात प्रकरणावर त्यांनी एका ओळीत मार्मिक पोस्ट लिहिली आहे. "प्रयत्ने चिंचोकी घासता लाख ही मिळे...", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली असून त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
यापूर्वी मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही पोस्ट लिहून अशोक खरात प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले होते. जर हे लोक पकडले गेले तरच भोंदू ठरतात, मग त्या आधी ते कोण असतात? असा सवाल अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला.
अशोक खरातच्या आर्थिक चौकशीला वेग (Ashok Kharat Financial Investigation)
एकीकडे एसआयटी तपास सुरू असतानाच आता आर्थिक चौकशीलाही वेग येणार आहे. आयकर विभागाकडून खरातच्या मालमत्तेची आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. उत्पन्नाचे स्त्रोत आणि आयकर विवरणपत्रांचीही पडताळणी होणार आहे. देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणाऱे रडारवर आहेत. त्यामुळे आता जमीन व्यवहार संबंधित लोकही पोलिसांच्या रडारवर आहेत. जवळपास 57 सातबारा अशोक खरात आणि कुटूंबियांच्या नावावर असल्याची माहिती मिळतेय. काही सातबाऱ्यांवर सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचं तपासत उघड झालं आहे. तसंच, ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांचीही तपासणी केली जाणार आहे. या चौकशीतून आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरातच्या घृणास्पद कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याची काल तब्बल 7 तास एसआयटीकडून कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान आजही अशोक खरातची एसआयटीकडून आणि आयकर विभागाकडूनही चौकशी केली जातेय. अशोक खरात, नीरज जाधव आणि दिपक लोंढे या तिघांची एकत्रित चौकशी होत असल्याची माहिती मिळतेय. तासाभरापासून चौकशी सुरू आहे. हिमांशू पोलीस क्लब येथे ही चौकशी केली जातेय. खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधाचे पुरावे आणि इतर माहिती एसआयटीकडून गोळा करण्याचे काम सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
