Drugs Seized : लक्षद्वीपच्या जवळ समुद्रात ड्रग्जची आणखी एक मोठी खेप डीआरआयच्या मदतीने तटरक्षक दलाने जप्त केली आहे. DRI आणि भारतीय तटरक्षक दलाने लक्षद्वीपजवळील समुद्रात ऑपरेशन खोजबीन अंतर्गत 1526 कोटी किमतीचे 219 किलो हेरॉईन जप्त केले आहे. गेल्या वर्षभरात डीआरआयने तस्करीसाठी समुद्रात आणले जाणारे सुमारे 25 हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. 


गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई
सुत्रांच्या माहितीनुसार, 7 मे रोजी, DRI म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाला गुप्त माहिती मिळाली होती की, लक्षद्वीपजवळील समुद्रात ड्रग्जची मोठी खेप भारताच्या सीमेवर पोहोचणार आहे. या माहितीवरून डीआरआयने भारतीय तटरक्षक दलाची मदत घेतली. यावेळी ICGS सुजित या कोस्ट गार्ड जहाजावर DRI अधिकारीही तैनात करण्यात आले होते आणि तेव्हापासूनच अरबी समुद्रात पाळत ठेवण्यास सुरुवात करण्यात आली होती. 


सर्व पाकिटे अवैध हेरॉईनने भरलेली होती
दरम्यान, 18 मे रोजी डीआरआयने तटरक्षक दलाच्या मदतीने प्रिन्स आणि लिटल-जिसस या दोन संशयास्पद बोटींचीही झडती घेतली होती आणि प्रत्येकी एक किलोची 219 पाकिटे सापडली. ही सर्व पाकिटे अवैध हेरॉईनने भरलेली होती. चौकशीत दोन्ही बोटींच्या कर्मचाऱ्यांनी ड्रग्जची ही खेप समुद्रातच मिळाल्याचे सांगितले.


हेरॉईनची ही खेप भारतात आली कुठून?
ड्रग्ज मिळाल्यानंतर डीआरआय आणि तटरक्षक दलाने बोटी कोचीला आणल्या आहेत. याठिकाणी या बोटींबाबच चौकशी करण्यात येणार आह. जेणेकरून हेरॉईनची ही खेप कोठून आली आणि ती भारतात कोठून पाठवली जाणार होती हे कळू शकेल.


भारतात पकडण्यात आलेली औषधांची चौथी मोठी खेप 
डीआरआयच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल 2022 पासून भारतात पकडण्यात आलेली ही औषधांची चौथी मोठी खेप आहे. गेल्या एका वर्षात एप्रिल 2021 पासून आतापर्यंत देशाच्या सागरी सीमेवरून विविध विमानतळांवर 3800 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या पकडलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 26 हजार कोटी आहे.


हेरॉईन जप्त


10 मे 2022 - दिल्ली कार्गो विमानतळावर 62 किलो हेरॉईन जप्त
20 एप्रिल 2022 - कांडला बंदर (गुजरात) येथे 20.6 किलो जिप्सम पावडर जप्त
29 एप्रिल 2022 - पिपाव बंदर (गुजरात) येथे धाग्यात गुंडाळलेले 396 किलो हेरॉईन
सप्टेंबर 2021 गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 3000 किलो हेरॉईन जप्त 
जुलै 2021  न्हावा शेवा बंदरातून 293 किलो हेरॉईन जप्त
एप्रिल 2021  तुतिकोरिन बंदरातून 303 किलो कोकेन जप्त करण्यात आले (कोकेनची आतापर्यंतची सर्वात मोठी खेप)
फेब्रुवारी 2021  तुघलकाबाद, दिल्ली येथून 34 किलो हेरॉईन