Andhra College Scandal Latest News: आंध्र प्रदेशातील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयात छुप्या कॅमेऱ्याने हॉस्टेलमधील मुलींचे आक्षेपार्ह अवस्थेतील 300 व्हीडिओ चित्रीत करण्याचा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये असणाऱ्या शौचालयात एक कॅमेरा लपवण्यात (Washroom Hidden Camera) आला होता. या कॅमेऱ्याने तरुणींचे आक्षेपार्ह व्हीडिओ चित्रीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील  गुडलावलेरु कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे ही घटना घडली. यानंतर  विद्यार्थ्यांनी  रात्रभर आंदोलन करुन महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला.


प्राथमिक माहितीनुसार, मुलींच्या वसतीगृहातील एका शौचालयात हा छुपा कॅमेरा लावण्यात आला होता. ही बाब समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुडलावलेरु महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या या सगळ्यांची कसून चौकशी करत आहेत. छुप्या कॅमेऱ्याने टिपण्यात आलेले हे व्हीडिओ शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या या तरुणाकडून इंटरनेटवर विकले जात होते, असेही समजते.  गुरुवारी 29 ऑगस्टला हा छुपा कॅमेरा विद्यार्थ्यांना सापडला. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. यानंतर आंध्र प्रदेश सरकारने तातडीने याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


पोलिसांनी ज्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे, त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून त्यामधील डेटा तपासून पाहिला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आम्हाला मुलींच्या हॉस्टेलमध्ये कोणताही छुपा कॅमेरा मिळाला नाही. आम्ही संशयित विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली. आतापर्यंत त्यांच्याकडे कोणताही व्हीडिओ सापडलेल नाही. महाविद्यालयातील तरुणींना काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले.


विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप


महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार, हॉस्टेलमध्ये सापडलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने 300 पेक्षा अधिक व्हीडिओ रेकॉर्ड करण्यात आले आहेत. हे व्हीडिओ मुलांच्या वसतीगृहात दाखवण्यात आले. या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरुन शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, त्याच्याकडून अद्याप मुलींचा आक्षेपार्ह अवस्थेतील कोणताही व्हीडिओ मिळालेला नाही. पोलीस आता याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 


आणखी वाचा


विद्यार्थिनींना नोटबूक तपासण्याच्या बहाण्याने बोलवायचा आणि अश्लील व्हिडीओ दाखवायचा, भिवंडी महापालिका शाळेच्या शिक्षकाला बेड्या