अकोला : आकोल्यातील एका प्रसिद्ध सराफाला चोरीचं सोनं खरेदी केल्या प्रकरणी अकोला पोलिसांनी अटक केली होती. अटकेत असताना दोन आरोपींना आपल्यावर नैसर्गिक अत्याचार करण्यास अकोला पोलिसांनी भाग पाडल्याचा आरोप या व्यापाऱ्याने केला आहे. अकोला पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमामातून या सराफा व्यापाराने हे आरोप केले आहेत. शाम वर्मा असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. 


अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्याला चोरीचे सोने खरेदी प्रकरणी शेगावातील शाम वर्मा या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली होती. त्याला अकोल्याला आणताना गाडीतूनच मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप या व्यापाऱ्याने केला आहे. रविवारी वर्मा यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांत एपीआय चव्हाण आणि कॉन्स्टेबल कांबळे यांनी आपल्याला उलटे करुन मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 


तक्रारकर्त्याला पोलिसांनी उलटं टांगलं आणि आधीच अटकेत असलेल्या दोन आरोपींना त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायला भाग पाडल्याचा आरोपही या पत्रात केला आहे. तक्रारकर्त्या वर्मांच्या पायावर गरम पाणी टाकल्याने त्यांचे पायही गंभीररित्या भाजले आहेत. या प्रकरणी तोंड उघडलं तर एन्काऊंटर करण्याची धमकी पोलिसांनी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


मंगळवारी शाम शर्मा यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कोला पोलीस अधीक्षक आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. अद्याप यावर कोणताही गुन्हा नोंद करुन घेण्यात आला नसल्याची माहिती आहे. या प्रकरणी एबीपी माझाने अकोला पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 
 
महत्त्वाच्या बातम्या :