Akshay Shinde, ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी (दि.28) एन्काऊंटर केला होता. मात्र पाच दिवस उलटूनही त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आरोपी अक्षय शिंदेचे वकिल चांगलेच संतापले आहेत. शिवाय, त्यांनी वकिलांना आणि अक्षयच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी केली होती, मात्र तरिही संरक्षण देण्यात आलं नाही, असंही नमूद केलंय. 


अक्षय शिंदेचे वकिल काय काय म्हणाले?  


अमित कटारनवरे म्हणाले, सरकारने अंत्यविधीची जबाबदारी घेतली आहे. मात्र अद्याप दफनविधीसाठी जागा मिळत नाही. जागा मिळवून देणे सरकारचे काम आहे. अंत्यविधी अद्याप झाला नाही. सोमवारी कोर्टात ही बाब मेन्शन करणार आहे. कोर्टात याबाबतची माहिती देणार आहे. आम्ही कुटुंबांसह वकील यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले असून अद्याप कुटुंबासह वकिलांना संरक्षण दिले नसल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे. 


बदलापूर प्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं?


बदलापूरतील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदेवर करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतली नसल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आरोपांना ताब्यात घेऊन फाशी देण्यात यावी यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठं आंदोलनही करण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांनंतर सरकारने आरोपी अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं. शाळेवरही प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, 23 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदे यांचं ठाणे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आलं. अक्षय शिंदेंनी पोलिसांवर हल्ला केला, त्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. तर शाळेतील इतर आरोपींना वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदे याला संपवलं नाही ना? असा संशय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला होता. 


आम्ही अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेऊ, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही


एन्काऊंटर करण्यात आल्यानंतर 5 दिवस उलटल्यानंतर अक्षय शिंदेंचे अंत्यसंस्कार झालेले नाहीत. त्यांच्या अंत्यसंस्काराला स्थानिक लोकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे तीन शहरांमध्ये आत्तापर्यंत त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा शोधण्यात आल्या आहेत. शिवाय राज्य सरकारने हायकोर्टात आम्ही अंत्यसंस्काराची जबाबदारी घेऊ, अशी ग्वाही देखील दिली होती. मात्र, अजूनही त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेले नाहीत. 


इतर महत्वाच्या बातम्या


Akshay Shinde : एन्काऊंटर होऊन 5 दिवस उलटले तरिही अक्षय शिंदेचा अंत्यविधी नाहीच, अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतही विरोधाचे बॅनर