Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा काल पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेनंतर विरोधकांनी पोलीस आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचं समर्थन करण्यात येत आहे. 


बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' असं एक्स प्लॅटफॉर्मवर (आधीचे ट्विटर) ट्रेंड सुरु आहे. देशभरातील एक्सवर ट्रेंडमध्ये देवाचान्याय पहिल्या क्रमांकावर असल्याचं दिसून येत आहे. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणानंतर सोशल मीडियावर एन्काऊंटरचं जोरदार समर्थन करण्यात येत आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट केल्या जात आहेत. 


पोलीस एवढेच लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा-


सदर प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा देखील साधला आहे. बलात्कार करणाऱ्यांना जागच्या जागी शिक्षा मिळाली पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची देखील भूमिका होती. राज्यात अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलंय त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं आहे का?  हे साधे प्रकरण नाही. न्यायालयीन कोठडीला गुन्हेगार आहे ज्याचा खटला तुम्ही फास्टट्रॅक कोर्टात चालवणार आहात आणि त्याला फाशी देणार आहात. त्याचं तातडीने एन्काऊंटर करण्याची गरज का पडली? याचे उत्तर द्यावे. कोणी पळून जात नव्हते. पोलीस व्हॅनमध्ये बेड्याने जखडलेला गुन्हेगार, बुरखा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल? पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेवरील पिस्तुल कसं काढेल? एवढेच आमचे पोलीस लेचेपेचे असतील तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 


शर्मिला ठाकरेंकडून बक्षीस जाहीर-


मनसेचे नेते अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी सदर घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जे झालं ते योग्य झालं, ज्या पद्धतीने ओरोपीने तीन-चार वर्षांच्या मुलीवर हात टाकताना मागेपुढे पाहिलं नाही. मी याआधी म्हटलं होतं, की आमचं सरकार असतं तर एन्काऊंटर केलं असतं. त्यामुळे झालेल्या घटनेचे आम्ही समर्थन करतो. शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी दोन्ही पोलिसांनी 51 हजार रूपये बक्षीस जाहीर केलं आहे. पैसे महत्त्वाचे नाहीत, परंतु याचं उत्तर असंच दिलं गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली. 


संबंधित बातमी:


Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?


संबंधित व्हिडीओ: