Akola Crime News: अकोला जिल्ह्यातील शेगाव-अकोट रस्त्यावर प्रेम प्रकरणातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. गौरव बायस्कार असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव. प्रेम प्रकरणातून गौरवची 4 जणांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर मारेकरी हे लोहाऱ्यातील मोरे कुटुंबातीलच असल्याचे समोर आले आहे. तसेच इतर दोन जणांचाही या हत्येमध्ये समावेश असल्याचा समजते आहे.

Continues below advertisement


Akola Crime: चाकूने सपासप वार करून गौरवला संपवलं; भरदिवसा हत्याकांडाने खळबळ


मिळालेल्या माहितीनुसार, मोरे कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि इतर 2 जण असे चार जणांनी एकत्रित गौरवची हत्या केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट-शेगाव रस्त्यावरील अंदुरा फाट्यावर भर दिवसा हे हत्याकांड घडले आहे. या प्रकरणात उरळ पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती. तर मारेकऱ्यांनी जवळील चाकूने गौरव बायस्कार याच्यावर सपासप चाकूने वार करीत गंभीर स्वरूपात जखमी केलंय. या घटनेत गौरवचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात उरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूये. मात्र, या घटनेने अंदुरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


Akola Crime News: प्रेम प्रकरणातून गौरवची हत्या?


प्रेम प्रकरणातून गौरवची हत्या झाल्याचे बोलले जाते. परंतु अद्यापही हत्येमागील मूळ कारण पोलिसांनी स्पष्ट केलं नाहीये. निंबा फाटा ते तेल्हारा मार्गावर कारंजा (रमजानपूर) फाट्याजवळ ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे, त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर पुढील तपास सध्या करत आहे.


पुण्यात चुलत भावाच्या खुनासाठी चार लाखांची सुपारी,चौघांना अटक


नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाचा खून करण्यासाठी आरोपीने साथीदारांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे. कात्रजमधील गुजरवाडी परिसरात अजयकुमार गणेश पंडीत (वय 22, सध्या रा. साईनगर, खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याचा तीक्ष्ण शस्त्राने खून केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडीत (वय 35, सध्या रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याला अटक केली होती. 17नोव्हेंबरला ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान, आरोपी चौकशीत अजयचे नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती अशोकला मिळाल्यानंतर त्याने अजयचा खून केल्याचे प्रथम समोर आले. त्यानुसार अशोकला अटक केली.


चार लाख रुपयांची सुपारी, पोलिसांनी केली तिघांना अटक


दरम्यान, अशोकने अजयकुमारचा खून करण्यासाठी साथादीर कृष्णकुमार विजयमहतो वर्मा (वय 21), सचिनकुमार शंकर पासवान (वय 26) तसेच खुनातील पहिला साक्षीदार रणजितकुमार धनुखी यादव (वय 30) यांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले.या गुन्ह्यात तोही सहभागी असल्याचे समोर आले. त्यावरून या चौघांचा शोध घेतला असता, ते पुणे रेल्वेस्थानकातून रेल्वेने झारखंडला पसार होणार असल्याचे समजले. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या