Nanded Murder Love Story: नांदेडच्या इतवारा परिसरात गुरुवारी प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून सक्षम ताटे (वय 20) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षमची निर्घृण हत्या (Nanded Crime) करण्यात आली आहे. दरम्यान सक्षमच्या हत्येनंतर (Crime)त्याची प्रेयसी आंचल मामीडवारने (Aanchal Mamidwar) सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलंय. एकंदरीत या घटनेनंतर नांदेडसह राज्यात एकच खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झालंय. या प्रकरणी आता प्रेयसी आंचल मामीडवारने प्रेम प्रकरणाची सुरुवात ते सक्षमची हत्या याचा संपूर्ण घटनाक्रम सांगत काही गंभीर आरोप केले आहे. तर पोलीस खात्यातील (Nanded police) एका पोलीस कर्मचाऱ्यानेच आपल्या भावाला सक्षमला संपवण्यास आणि हा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं तिने सांगितलंय. भावनेचा आणि रागाच्या भरात माझ्या भावाने सक्षमची हत्या केली, अशी माहिती आंचलने दिली.
Nanded Murder News: आता त्याला मरूनच इथं येतो...
या संदर्भात बोलताना आंचल म्हणाली कि, घटनेच्या दिवशी सकाळी लहान भाऊ मला म्हणाला पोलीस स्टेशनला चल आणि सक्षमवर गुन्हा दाखल कर. तो बळजबरी करत होता. मात्र मी तक्रार दिली नाही. मी सर्व पोलिसांसमोर सांगितलं, मला सक्षमवर गुन्हा दाखल करायचा नाही. तेव्हा पोलीस कर्मचारी धीरज कोमलवार माझ्या लहान भावाला म्हणाले, रोज मारामाऱ्या करून इथं येतोस. तुझ्या बहिणीचं लफडं ज्याच्यासोबत आहे त्याला मारून ये, असं बोलून त्या कर्मचाऱ्याने माझ्या भावाला भडकावलं आणि असे कृत्य करण्यास प्रवृत्त केलं. रंगाच्या भरात त्यावर माझा भाऊ बोलला त्याला मरूनच इथं येतो. त्यानंतर ही हत्या घडली," अशी माहिती आंचल मामीडवारने दिली आहे.
Nanded Crime : मरुनही माझा प्रियकर जिंकला
सक्षम आणि आंचल याचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सक्षम वेगळ्या जातीचा असल्याने हे प्रेमसंबंध आंचलच्या घरच्यांना मान्य नव्हते. सक्षम ताटे जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या कुटुंबातील लोक त्याच्या खूनाचा कट रचत होते, असे आंचलने सांगितले. आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही आंचलने केली. पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाड यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर,गजानन बालाजीराव मामीलवाड,साहील ठाकूर,सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या